शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वांगीत येरळा नदीपात्रातील खड्डयांचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST

कडेगाव : वांगी (ता. कडेगाव) येथे बेकायदा वाळू उपसाप्रकरणी महसूल विभागाने येरळा नदीपात्रातील खड्डयांचे पंचनामे केले, तर ...

कडेगाव : वांगी (ता. कडेगाव) येथे बेकायदा वाळू उपसाप्रकरणी महसूल विभागाने येरळा नदीपात्रातील खड्डयांचे पंचनामे केले, तर बेकायदा वाळू उपसाप्रकरणी संशयितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात पंचनामे दिले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी दिली.

मरकड म्हणाले, तालुक्यात येरळा व नांदणी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे येरळा व नांदणी नदीतून होणारा बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी तलाठी व मंडल अधिकारी यांची पथके तयार केली असून, त्यांना वाळूचा अवैध उपसा रोखण्यासाठी सक्त आदेश देण्यात आले आहेत.

त्याप्रमाणे वांगी येथील तलाठी व मंडल अधिकारी यांना वांगी येथे येरळा नदी पात्रातून वाळूचा बेकायदा उपसा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी नदीपात्रातून वाळू उपसा केलेल्या ठिकाणच्या खड्डयांचे पंचनामे केले. वांगी गावच्या हद्दीत त्यांनी एकूण ५०० ब्रासच्या खड्डयांचे पंचनामे केले आहेत. तालुक्यातील इतर गावातही येरळा व नांदणी नदी पात्रात बेकायदा वाळूचा उपसा झाल्याचा तक्रारी आहेत. तेथीलही पंचनामे महसूलच्या पथकाकडून केले जाणार आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच दाेषींवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला जाणार आहे.

वांगी येथे महसूल विभागाने अवैध वाळू उपसाप्रकरणी नदीपात्रातील खड्डयांचे केलेले पंचनामे चिंचणी - वांगी पोलिसात दिले असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहे.

चिंचणी - वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप साळुंखे म्हणाले, महसूलच्या पंचनाम्यात संबंधितांची नावे नसल्याने याबाबत अद्याप कोणावरही गुन्हे दाखल केले नाहीत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल.