जनता कर्फ्यूत रुग्णालय आणि औषध दुकाने उघडी राहतील. याशिवाय दूध संकलनासाठी सकाळी ६ ते ८ व सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत वेळ देण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांना प्राथमिक शाळेत विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. बाधित रुग्ण मोकाटपणे फिरताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बैठकीस उपसरपंच डॉ. रामगौंडा पाटील, मारुती जमादार, अजित हेगडे, भाजप तालुकाध्यक्ष शंकर शिंदे, तलाठी आर. आर. कारंडे, ग्रामसेवक उज्ज्वला आवळे, राजू रजपूत, दीपक कांबळे, मिरज ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक समाधान बिल्ले उपस्थित होते.