शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

हिमोफिलियाबाबत जनजागृती आवश्यक

By admin | Updated: January 25, 2015 00:43 IST

कंजक्षा घोष : रुग्णांनी तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे कार्यशाळेत आवाहन

सांगली : समाजात कमी प्रमाणात आढळून येणाऱ्या ‘हिमोफिलिया’ या आजाराबाबत जनजागृती गरजेची असून, संबंधित रुग्णांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन हिमोफिलिया फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष कंजक्षा घोष यांनी केले. जिल्ह्यातील हिमोफिलिया रुग्णांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना डॉ. घोष म्हणाले, हिमोफिलिया हा अनुवंशिक आजार असून, पालकांच्या जनुकाव्दारे तो मुलांमध्ये येतो. या आजारामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया सदोष असल्याने यामध्ये जखम झाल्यावर अथवा दात काढल्यावर रक्त वाहणे बंद होत नाही. रक्त गोठण्यासाठी उपयुक्त घटकांची कमतरता असल्याने या आजाराच्या रुग्णांना इंजेक्शनच्या माध्यमातून संबंधित घटक पुरविले जातात. या आजाराने जिल्ह्यात सुमारे ९० रुग्ण ग्रस्त आहेत. त्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. सध्या भारतात या आजाराचे सोळा हजार रुग्ण आहेत. संबंधितांनी शासकीय रुग्णालयातून उपचार घ्यावेत जेणेकरून त्यांची नोंद रुग्णालयाच्या नोंदवहित करण्यात येईल. यामुळे रुग्णांसाठी भविष्यात कोणतीही शासकीय योजनेची अंमलबजावणी करावयाची असेल तर, प्रशासनास हिमोफिलियाचे नक्की किती रुग्ण आहेत, याची आकडेवारी उपलब्ध होईल. सायंकाळी शहरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते. शहरातील विविध वैद्यकीय अधिकाऱ्यांना डॉ. घोष, डॉ. देवीला साहू, डॉ. जयश्री काळे आदींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता दीप्ती डोणगावकर, डॉ. विकास कुरेकर, हॉ. अरविंद मांजरेकर, विजयकुमार निरवाणे, सदाशिव हेगडे आदी उपस्थित होते.