शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मिरज शहरात मिरवणूक

By admin | Updated: December 24, 2015 23:46 IST

‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात : विविध सामाजिक उपक्रम

मिरज : मिरज शहर व परिसरात पैगंबर जयंती तसेच ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली. बाराईमाम दर्ग्यापासून शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. मीरासाहेब दर्गा आवारात या मिरवणुकीचा समारोप झाला.बाराईमाम दर्ग्यापासून मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरूण व मुले घोषणा देत सहभागी झाली होती. लक्ष्मी मार्केट, बुधवार पेठ, गुरूवार पेठ येथून फिरून मिरवणुकीचा समारोप झाला. याप्रसंगी मीरासाहेब दर्ग्याच्या पटांगणात विशेष प्रार्थना झाली. मिरवणुकीत घोड्यावर बसलेली लहान बालके टिपू सुलतानच्या वेशभूषेत होती. पीआरपी, एमआयएम आणि फाईन ग्रुपतर्फे मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना सरबत वाटप करण्यात आले. ए. जी. नदाफ, महंमद सतारमेकर, मुस्तफा मुश्रीफ, रफिक मुजावर, असगर शरीकमसलत, समीर सय्यद, जैलाब शेख, अय्याज नायकवडी, जहिर मुजावर यांच्यासह कार्यकर्त्यांनी संयोजन केले.दर्गा आवारात मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी नात शरीफ, सलाम व प्रार्थना झाली. दर्गा पेशईमाम, कादरी जनाब, हाफीज महंमदहनिफ मुल्ला यांनी प्रेषित पैगंबरांचे विचार सांगितले. अतिरिक्त अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, दर्गा सरपंच अब्दुल अजिज मुतवल्ली उपस्थित होते. ईद-ए-मिलादनिमित्त मिरज शहरात विविध ठिकाणी अन्नदान केले. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज शहरात राज्य राखीव दलासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)घोडे, बैलगाड्या मिरवणुकीचे आकर्षणमिरवणुकीत घोड्यावर बसलेली लहान बालके टिपू सुलतानच्या वेशभूषेत होती. रिक्षा, बैलगाड्या व डफवादक मिरवणुकीत सहभागी झाले होते. पीआरपी, एमआयएम आणि फाईन ग्रुपतर्फे मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना सरबत वाटप करण्यात आले.