शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

गुंडेवाडीमध्ये मिरवणुकीत दोन गटामध्ये हाणामारी

By admin | Updated: June 12, 2016 01:13 IST

तिघांना अटक : दगडफेकीमुळे गावात तणाव

मिरज : गुंडेवाडी (ता. मिरज) येथे शुक्रवारी रात्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही जणांनी दगडफेक करून डिजिटल फलक फाडल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला होता. यातून मिरवणुकीतील दोघांना लोखंडी गज व दगडाने मारहाण करण्यात आली. याबाबत ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. गुंडेवाडी येथे अहिल्यादेवी तरूण मंडळातर्फे बस स्थानकापासून ग्रामपंचायतीपर्यंत ट्रॅक्टरमधून अहिल्यादेवी प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक सुरू असताना ध्वनिक्षेपकाचा आवाज मोठा असल्याचा आक्षेप काही जणांनी घेतल्याने दोन गटात वाद निर्माण झाला. यातून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. जमावाने फलकही फाडले. अनिकेत लक्ष्मण पाटील या मुलास दगड लागल्याने, त्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या कुमार दत्तात्रय पाटील व ओंकार पाटील यांना चार जणांनी बेदम मारहाण केली. ओंकार पाटील यांच्या डोक्यात लोखंडी गजाने वार केल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. तरीही पोलिस फिरकले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. रात्री उशिरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दोन्ही गटाच्या समर्थकांची गर्दी झाली होती. याबाबत पोलिसांनी सुरुवातीस अदखलपात्र तक्रारीची नोंद करून शनिवारी गुन्हा दाखल केला. मारहाणप्रकरणी भगवान खांडेकर, विजय खांडेकर, राजेंद्र खांडेकर या तिघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. परस्परविरोधी तक्रार कुमार दत्तात्रय पाटील याने, भगवान कुशाबा खांडेकर, विजय बबन खांडेकर, राजेंद्र बबन खांडेकर, पिंटू बबन खांडेकर यांनी मिरवणूक पुढे घेण्यासाठी दमदाटी करून मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. तसेच मिरवणुकीत लावलेल्या गाण्याचा आवाज कमी करा असे सांगितल्याने संभाजी हजारे, तानाजी हजारे, अनिल पाटील व गोट्या पाटील यांनी बाबासाहेब खांडेकर, राजू खांडेकर यांना मारहाण केल्याचे आशा बाबासाहेब खांडेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. परस्परविरोधी तक्रारी दाखल करून घेतल्या असून याची चौकशी पोलिस करीत आहेत.(वार्ताहर)