शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियदर्शनी जागुष्टेची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप

By admin | Updated: January 2, 2015 00:20 IST

रत्नागिरीची कन्या : खुल्या स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्यपदक

रत्नागिरी : टाटानगर (झारखंड) येथे नुकत्याच झालेल्या ‘खुल्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग, बेंचप्रेस व डेडलिफ्ट अजिंक्यपद स्पर्धेत प्रियदर्शनी जागुष्टे हिने दोन सुवर्ण व एक रौप्य अशा तीन पदकांची कमाई केली.यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी तिला तीन वेळा मिळाली होती. सन २००९च्या कॉमन वेल्थ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तिने भारताला सुवर्ण व स्ट्राँग गर्ल आॅफ कॉमन वेल्थ हा किताब मिळवून दिला आहे. २०११च्या एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तिने ३ सुवर्णपदके मिळवून उच्चांक केला. आता नुकत्याच झालेल्या खुल्या गटाच्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग, बेंचप्रेस, डेडलिफ्ट स्पर्धेत तिने दोन सुवर्ण व एक रौप्य पदक भारताला मिळवून दिले.या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी वैशाली कानिटकर यांच्या माध्यमातून मदतीचे अनेक हात पुढे आले. आपल्याला या स्पर्धेत जायचे होते. मात्र मदतीची अपेक्षा होती. यासाठी वैशाली कानिटकर यांनी खूपच मदत केली. केवळ त्यांच्यामुळेच प्रियदर्शनी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळू शकली. त्यामुळे ही पदके त्यांना अर्पण करीत असल्याचे प्रियदर्शनी जागुष्टे हिने स्पर्धेनंतर बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)यापूर्वी राष्ट्रीय सिनीयर, ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग स्पर्धांतून सलग २ वर्षे स्ट्राँग वुमन हा किताब पटकावणारी रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे; महाराष्ट्रातील एकमेव मुलगी आहे. एशियन स्पर्धेत ४ सुवर्ण, तर कॉमन वेल्थमध्ये ४ सुवर्ण व स्ट्राँग गर्ल आॅफ कॉमन वेल्थ हा किताबही या गुणी खेळाडूने मिळवला आहे. सर्व स्तरातून तिच्या या उत्तुंग यशाबद्दल कौतुक होत आहे.