शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेचा वाजला बोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांचा परिपूर्ण सर्व्हे झालेला नसल्याने त्यांची संख्या निश्चित नाही. वीस हजारावर अर्ज आले, पण छाननी करून पात्र-अपात्र यादीही तयार करण्यात आलेली नाही. साडेसहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरात आतापर्यंत केवळ २३१ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेला २०१७ मध्ये सुरुवात. लाभार्थ्यांचा सर्व्हे, अर्ज स्वीकारणे, छाननी व डीपीआर तयार करून तो शासनाकडे पाठविण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्यात आली. पण, वर्षभरातच एजन्सीने काढता पाय घेतला. त्यानंतर ६० हजार रुपये पगारावर चार अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली. तरीही योजनेला गती आली नाही. वैयक्तिक लाभाची २३१ प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यांना पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे, तर २८८ घरांची योजना मिरजेतील समतानगरला सुरू आहे.

शहरात लाभार्थींची संख्या अजूनही निश्चित नाही. त्याचा सर्व्हे झालेला नाही. त्यात २० हजारावर अर्ज आले आहेत. पण छाननी होऊ शकलेली नाही. गुंठेवारी, वेतन जमिनी, आरक्षित जागांवरील गुंठेवारीतील नागरिकांनीही अर्ज केले आहेत. दुसरीकडे काही प्रकरणे नगररचना विभागाकडे प्रलंबित आहेत. बांधकाम परवानाच दिला नसल्याने घरांचे स्वप्न सत्यात उतरलेले नाही.

चौकट

आतापर्यंत योजनेची प्रगती

१२० प्रकरणे म्हाडाकडे प्रलंबित आहेत. १७१ लाभार्थ्यांची छाननी करून प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पूरबाधित ६० घरांचाही डीपीआर शासनाकडे दिला आहे. १३१ प्रकरणांची छाननी करून त्याचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. समतानगरला २८८ घरांची योजना सुरू आहे. या साऱ्या कामासाठी चार वर्षाचा कालावधी लागला आहे.

चौकट

झोपडपट्टीमुक्त शहर ठरणार दिवास्वप्न

केंद्राच्या झोपडपट्टीमुक्त शहर योजनेत सांगलीचा समावेश आहे. त्यासाठी २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. पण आजअखेर एकाही झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यात आलेले नाही. शासनाने वेळोवेळी या योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी अध्यादेश काढले. पण, त्याची अंमलबजावणी करण्यात महापालिकेने स्वारस्य दाखविलेले नाही. त्यामुळे २०२२ पर्यंत झोपडपट्टीमुक्त शहर दिवास्वप्नच ठरणार आहे.

कोट

गोरगरिबांना हक्काचे घर देणारी ही योजना महापालिकेच्या कुचकामी धोरणामुळे रखडली आहे. अभ्यासू अधिकारी नाहीत. नगरसेवकांनाही स्वारस्य नाही. नगररचनाकडून वेळेवर बांधकाम परवाने दिले जात नाहीत. गुंठेवारी समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी केलेली नाही. चांगल्या योजनेचे महापालिकेच्या कर्तृत्वामुळे वाटोळे होण्याची वेळ आली आहे.

- जगन्नाथ ठोकळे, सभापती, प्रधानमंत्री आवास योजना.