इस्लामपूर येथे सतीश झेंडे आणि वसुंधरा झेंडे यांचा सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शशिकांत शिंदे, अजिंक्य कुंभार उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी नेहमीच शासनाच्या मॉडर्न स्कूल, प्रधानमंत्री व रमाई आवास योजना प्रभावीपणे राबवून वाळवा तालुक्याचे नाव जिल्ह्यात अग्रेसर ठेवल्याचे गौरवोद्गार सभापती शुभांगी पाटील यांनी काढले.
पंचायत समितीच्या सभागृहात वाळवा तालुका ग्रामसेवक संघाच्यावतीने सेवानिवृत्त झालेल्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचा सत्कार सभापती पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक संघाचे तालुकाध्यक्ष जयवंत थोरात, राहुल सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सतीश झेंडे, आर. डी. कमाणे, अजित थोरात, ए. आर. संदे या सेवानिवृत्त ग्रामसेवकांसह विस्तार अधिकारीपदी नियुक्ती झालेले विजय यादव, ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती मिळालेले अशोक खोत, डी. पी. सिंग, आर. एच. पाटील, विष्णू गुरव यांना सन्मानित करण्यात आले.
सुरेश सातवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुबेर कांबळे यांनी आभार मानले. यावेळी विस्तार अधिकारी अविनाश दाईंगडे, शुभांगी भारती, भास्कर पवार, एस. डी. यादव उपस्थित होते.