शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात सांगलीच्या ‘एल्गार’ची तयारी

By admin | Updated: September 20, 2016 00:05 IST

मराठा क्रांती मूक मोर्चा नियोजन : गावोगावी बैठका; पन्नास हजार समाजबांधव मोर्चाला जाणार

कडेगाव : मराठा समाजाच्यावतीने २७ सप्टेंबरला सांगली येथे होणाऱ्या विराट मराठा क्रांती मूक मोर्चाची कडेगाव तालुक्यात जय्यत तयारी सुरू आहे. तालुक्यातून पन्नास हजारावर समाजबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत. यासाठी कडेगाव तालुक्यात गावोगावी नियोजन बैठका सुरू आहेत. कडेगाव तालुक्यातील चिंचणी, तडसर, शाळगाव, येतगाव आदी गावात मराठा क्रांती मोर्चासाठी नियोजन बैठक झाली. वांगी, कडेपूर, कडेगाव, देवराष्ट्रे, नेवरी, हणमंतवडिये, नेर्ली, तोंडोली, मोहित्यांचे वडगाव, आसद आदी गावांत नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे. याशिवाय कडेगाव तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या गावांमध्ये नियोजन व आढावा बैठक सुरू आहेत. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा आरक्षण आदी विविध मागण्यांबाबत मराठा समाजबांधव संघटित होत आहेत. प्रारंभी कडेगाव तालुक्यातील ५५ गावांमधील समाजबांधवांचा मेळावा कडेपूर येथील राजवीर मंगल कार्यालयात झाला होता. यावेळी झालेल्या नियोजनाप्रमाणे गावोगावी मराठा समाजबांधवांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनास प्रतिसाद देत मराठा समाजबांधव एकसंधपणे सांगलीतील मोर्चासाठी नियोजन करीत आहेत. यामध्ये सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर होत आहे. कोणत्याही मदतीची अपेक्षा न करता संबंधित गावातून दुचाकी, चारचाकी वाहने तसेच मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा घेऊन २७ सप्टेंबरला सांगलीत दाखल होणार, असे मराठा समाजबांधव स्वयंस्फूर्तीने सांगत आहेत. कडेगाव तालुक्यातील नेताजी यादव, दादासाहेब यादव, राजेंद्र मोहिते, अ‍ॅड. प्रमोद पाटील, राहुल पाटील, प्रकाश सूर्यवंशी, समरजित गायकवाड, सुनील मोहिते, हर्षवर्धन थोरात, रामचंद्र कणसे, कृष्णात मोकळे, किशोर जाधव, विनोद गायकवाड, अभिजित महाडिक, रवी पाटील आदी समाजबांधव कार्यकर्ता म्हणून गावोगावी नियोजन बैठकांना हजर राहून मराठा समाजबांधवांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. तडसर येथे हणमंत पवार, रोहित झपाटे, ज्ञानदेव पवार, सूरज पवार, संभाजी शेळके, भाऊसाहेब पवार, योगेश पवार, शाळगाव येथे विजय करांडे, मंदाताई करांडे, बोंबाळेवाडीचे सरपंच विनायक पवार, महेंद्र करांडे, संभाजी मुळीक, हणमंतराव गायकवाड, जयदीप देशमुख, रामचंद्र कणसे, तुकाराम मगर-पाटील, किरण इंगळे, किशोर जाधव, विनोद गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)नेत्यांची राजकारणविरहित साथमाजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, ज्येष्ठ नेते मोहनराव कदम, जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, युवा नेते जितेश कदम यांनी मराठा क्रांती मोर्चासाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करू, असे सांगितले. दरम्यान, मोर्चात राजकारणविरहित मराठा समाजातील कार्यकर्ता म्हणून सहभागी होणार असल्याची भूमिका नेतेमंडळींनी घेतली आहे.