शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

कडेगावात पुन्हा सत्तासंघर्षाची तयारी

By admin | Updated: October 26, 2014 23:15 IST

राजकारण तापणार : ६५ संस्थांच्या निवडणुका लवकरच

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ६५ सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. नवीन सहकार कायदा व नवीन नियमावलीप्रमाणे या निवडणुका होणार आहेत. डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत दोन टप्प्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर थंड झालेली राजकीय हवा आता गावोगावी होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांनी गरम होणार आहे. प्रामुख्याने तालुक्यात ३४ सर्वसेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकीत अटीतटीचा राजकीय सत्तासंघर्ष होणार आहे. कडेगाव तालुक्यातील ५५ गावांमध्ये तब्बल ६५ सहकारी संस्थांची निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी डॉ. पतंगराव कदम यांनी बाजी मारली असली, गावोगावी पृथ्वीराज देशमुख यांचा तुल्यबळ गड अस्तित्वात आहे. यामुळे आता पुन्हा कदम-देशमुख गटातील राजकीय सत्तासंघर्ष उफाळून येणार आहे.कडेगाव तालुक्यातील ३४ सर्वसेवा सहकारी संस्था, दोन सहकारी सूतगिरण्या, एक दूध उत्पादक संघ, चार नोकरदारांच्या पतसंस्था, १९ ग्रामीण पतसंस्था, एक इतर विविध उद्योग संस्था, अशा तब्बल ६५ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. शासनाने नवीन सहकार कायद्यानुसार निवडणूक प्राधिकरण स्थापन करुन निवडणुकांसाठी आवश्यक ती यंत्रणा राबविली आहे. गावोगावच्या सहकारी संस्थांकडून मतदानासाठी पात्र सभासदांची कच्ची यादी मागविली आहे.एकाचवेळी तालुक्यातील ६५ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने प्रशासनावरही ताण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सभासद याद्या मिळविण्यापासून मोर्चेबांधणीला वेग येत आहे. नव्या नियमानुसार कोण पात्र आणि कोण अपात्र याची सभासदवर्गात चर्चा सुरू आहे. नजिकच्या काळात कडेगावातील वातावरण तापणार आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायत आणि गावातील सहकारी सोसायटी या दोन्ही संस्थांमध्ये वर्चस्वासाठी राजकीय सत्तासंघर्ष परंपरागतपणे गावोगावी सुरू आहे. आता नव्या सहकार कायद्यानुसार निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी स्थानिक नेतेमंडळीही सज्ज झाली आहेत. यासाठी कच्च्या याद्यांवर सर्वांचे लक्ष आहे.