शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘अंनिस’च्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: May 13, 2016 00:16 IST

कॉफी वुईथ साईनाथ’

सांगली : शहरात प्रथमच होत असलेल्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू असून देशभरातून येणाऱ्या साहित्यिक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने शहरवासीयांना दर्जेदार पुरोगामी साहित्य व विचार ऐकण्याची संधी मिळणार असल्याने या साहित्य संमेलनात शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाच्या संयोजकांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले. शनिवार, दि. १४ व रविवार दि. १५ मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अ‍ॅड. के. डी. शिंदे, प्रा. प. रा. आर्डे, संजय बनसोडे, राहुल थोरात आदींनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यांनी सांगितले की, माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स सभागृहात संमेलन होणार आहे. दोन दिवसांपासून मंडप उभारणीचे काम सुरू आहे. राज्यातील व देशातील अनेक नामवंत साहित्यिक शुक्रवारपासून सांगलीत येण्यास सुरुवात होत आहे. पुस्तकांचे दालन उभे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्यंगचित्र प्रदर्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन या संमेलनाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे. दरम्यान, यावेळी ‘अंनिस’च्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलन स्थळावरील फलकाचे अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)‘कॉफी वुईथ साईनाथ’जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांची उपस्थिती आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत माध्यमांसाठी ‘कॉफी वुईथ पी. साईनाथ’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले.‘अंनिस’च्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलन स्थळावरील फलकाचे अनावरण गुरुवारी करण्यात आले.