शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापगडावर केवळ गवत अन् शेणीचीच होळी !

By admin | Updated: March 11, 2017 22:00 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे.

आॅनलाईन लोकमतमहाबळेश्वर (सातारा), दि. 11 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या प्रतापगड किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या किल्ल्यावर आजही साजरे केले जाणारे सण, उत्सव शिवरायांनी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच साजरे केले जातात. शिवरायांचे वृक्षप्रेम हे सर्वश्रूत आहे. म्हणूनच किल्ल्यावर गवत अन् शेणीची होळी पेटविण्याची प्रथा सुरू झाली. विशेष म्हणजे, गेल्या ३५८ वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, शिवरायांच्या हुकूमाचे आजही काटेकोरपणे पालन केले जात आहे.प्रतापगड किल्ला हा मराठा साम्राज्याच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देत उभा आहे. शिवरायांच्या अनेक आठवणी या किल्ल्याशी जोडल्या गेल्या आहेत. किल्ल्यावर असलेल्या भवानी मातेच्या स्थापना कालापासून शिवरायांनी या ठिकाणी विविध धार्मिक सण, उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. शिवरायांनी आखून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच सर्व सण पारंपरिक पद्धतीने आजही साजरे केले जात आहेत.होळी हा त्यापैकी एक सण. शिवराय हे वृक्षप्रेमी होते. वृक्षांचे महत्त्व ओळखून त्यांनी वृक्षांचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला आणि रयतेलाही याचे महत्त्व विशद करून दिले. होळीच्या दिवशीही फळे, फुले देणाऱ्या वृक्षांची कत्तल न करता केवळ गवत अन् शेणीची होळी पेटविण्याची प्रथा शिवरायांनी भवानीमातेच्या स्थापनेपासून सुरू केली. या घटनेला ३५८ वर्षे झाली असली तरी आजही शिवरायांच्या हुकूमाचे काटेकोर पालन करून किल्ल्यावर होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात आहे.असा होतो सण साजरा ...श्री भवानीमातेची होळी ही ऐतिहासिक होळी म्हणून ओळखली जाते. मंदिर परिसरातील होळीचा माळ याठिकाणी होळी पेटविली जाते. किल्लेदार विजय हवालदार यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळीची विधिवत पूजा केली जाते. यानंतर हडप गुरुजी यांचा हस्ते होळी पेटवली जाते. ही होळी पेटविल्याशिवाय पंचक्रोशीतील होळ्या पेटविल्या जात नाहीत. अडीअडचणींवर एकीतून मातश्री भवानीमातेच्या पालखीची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढली जाते. दुसरा दिवस हा धुळवडीचा असतो त्या दिवशी सर्व ग्रामस्थ केदारेश्वर मंदिरात जमतात. याठिकाणी गावातील अडीअडचणींवर चर्चा केली जाते. तसेच त्या अडचणी सोडविण्यासाठी विचारविनिमय केला जातो. या परंपरेमुळे गावात एकी कायम राहत असून, विचार विनिमय झाल्याशिवाय किल्ल्यावर दैनंदिन व्यवहार सुरू होत नाहीत.