शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद सूर्यवंशीसह आठजणांना अटक

By admin | Updated: July 2, 2015 00:24 IST

दोघांवर खुनीहल्ला : छेडछाडीच्या संशयावरून काठीने बेदम मारहाण

सांगली : दोघा तरुणांंना छेडछाड करीत असल्याच्या संशयावरून काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचा माजी नगरसेवक प्रमोद प्रकाश सूर्यवंशी (वय ३५, रा. बुरुड गल्ली, सांगली) याच्यासह आठजणांंना शहर पोलिसांनी अटक केली. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी येथील नदीघाटावर घडला होता. सर्वांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सातारा येथील अर्शद राजेसाहेब बागवान (वय २४, रा. गोपाळ पेठ) व असिफ बागवान (वय २१, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) गवळी गल्लीत जात असताना प्रमोद सूर्यवंशीसह आठ ते दहाजणांनी त्यांना रस्त्यात अडवले. गल्लीत आल्याचा जाब विचारून दोघांंना दुचाकीवरून वसंतदादा समाधीजवळ नेले आणि काठीने बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर, पाठीवर व छातीवर काठीने मारहाण करण्यात आली. तेथील काही नागरिकांनी कळवताच शहर पोलीस ठाण्याचे पथक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी दोघांची सुटका केली. त्यानंतर सूर्यवंशीसह आठजण तेथून निघून गेले. मंगळवारी रात्री प्रमोद सूर्यवंशीसह विजय बळीराम साळुंखे (वय ४४, रा. सदर बाजार, सातारा), अमोल प्रकाश वास्कर (२८), धनंजय दत्तात्रय गवळी (२३), प्रतीक समीर मालवणकर (२३), विकास पद्माकर सोनटक्के (२९), किशोर बाळू वास्कर (२३), ऋषिकेश जयवंत कांबळे (२३, सर्व रा. गवळी गल्ली, सांगली) यांच्यावर बेकायदा जमाव जमवणे, खुनाचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री याबाबत जखमी अर्शद बागवान याचा जबाब घेतल्यानंतर या आठजणांना बुधवारी पहाटे अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असता, तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. काँग्रेसचा माजी नगरसेवक असलेला प्रमोद सूर्यवंशी याच्यावर मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)