शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश शेंडगे म्हणतात, आरेवाडीतील दसरा मेळाव्याला हार्दिक पटेलला निमंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:52 IST

सांगली : आरेवाडी येथील दसरा मेळाव्यासाठी आम्ही गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना कोणतेही निमंत्रण दिलेले नाही. ट्रस्टींच्या निर्णयाप्रमाणे याठिकाणचा धनगर समाजाचा मेळावा होणार आहे, अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.शेंडगे यांच्यासोबत यावेळी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बिरू कोळेकर, दाजी कोळेकर, सचिन कोळेकर आदी ...

सांगली : आरेवाडी येथील दसरा मेळाव्यासाठी आम्ही गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना कोणतेही निमंत्रण दिलेले नाही. ट्रस्टींच्या निर्णयाप्रमाणे याठिकाणचा धनगर समाजाचा मेळावा होणार आहे, अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.शेंडगे यांच्यासोबत यावेळी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बिरू कोळेकर, दाजी कोळेकर, सचिन कोळेकर आदी पदाधिकारी तसेच देवस्थानचे पुजारी रघू कोळेकर उपस्थित होते. शेंडगे म्हणाले की, आरक्षणासह समाजाच्या सर्व प्रमुख मागण्यांसाठी यावेळचा दसरा मेळावा निर्णायक स्वरुपाचा असेल. या मेळाव्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. समाजातील कोणत्याही नेत्यास डावलले नाही. गोपीचंद पडळकरसुद्धा मेळाव्यात येऊन समाजाला मार्गदर्शन करतील, अशी आमची खात्री आहे. समाजाच्या प्रश्नासाठी आम्ही एक आहोत, असा संदेशही आम्ही देणार आहोत. या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारला अल्टिमेटम देण्यात येईल. सरकारने जर आरक्षणाचा प्रश्न सोडविला नाही, तर भविष्यातील आंदोलनाची दिशा काय राहील, याविषयीची चर्चाही मेळाव्यात करण्यात येणार आहे. सरकारबद्दल आमची नाराजी आहे. सरकारने गेल्या चार वर्षात आरक्षणाचा प्रश्न सोडविलेला नाही. त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. कोणत्याही सरकारच्या काळात आजवर समाजाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे क्रांतिकारी पाऊल टाकण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे. हार्दिक पटेलना आम्ही निमंत्रण दिलेले नाही. त्याबाबतचा ट्रस्टींनी कोणताही निर्णय घेतला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.देवस्थानचे पुजारी कोळेकर म्हणाले की, आरेवाडीतील मेळाव्याच्या नियोजनासाठी ग्रामसभेत चर्चा झाली. त्यावेळी अध्यक्ष अनुपस्थित राहिल्यामुळे उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते. त्यामुळे त्यादिवशी जे नियोजन झाले आहे, त्याप्रमाणेच मेळावा होईल. हार्दिक पटेल यांना निमंत्रण देण्याचा विषय चर्चेला आला नाही.पक्ष नव्हे, जनतेचा निर्णय मान्य : शेंडगेजत विधानसभा मतदारसंघाची जागा कॉँग्रेसकडे घेऊन याठिकाणी विक्रम सावंत यांना उमेदवारी देण्याबाबतची घोषणा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याबाबत शेंडगे म्हणाले की, पक्षाच्या निर्णयापेक्षा जनतेचा निर्णय महत्त्वाचा असतो. याठिकाणी लवकरच जनता उमेदवारीबद्दल निर्णय घेईल. त्या निर्णयाचा पक्षाशी कोणताही संबंध असणार नाही. माझा निर्णय हा जनतेच्या मतावर अवलंबून असेल. पक्षाच्या निर्णयाशी जनतेचा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले.मतभेद उजेडातआरेवाडी देवस्थान ट्रस्टमध्येच मतभेद असल्याची बाब सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट झाली. ट्रस्टचे अध्यक्ष यावेळी गैरहजर होते. अध्यक्ष पडकरांसोबत आणि उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी शेंडगेंसोबत असल्याचे दिसून आले.