शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका कार्यालयात टपाल व बारनिशी विभाग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST

महापालिकेचे उपायुक्त, सर्व प्रभाग समिती कार्यालय, माहिती अधिकार कक्ष व इतर विभागांतील सर्व टपाल शाखा व बारनिशी विभागात ...

महापालिकेचे उपायुक्त, सर्व प्रभाग समिती कार्यालय, माहिती अधिकार कक्ष व इतर विभागांतील सर्व टपाल शाखा व बारनिशी विभागात थेट पत्र, अर्ज, निवेदन स्वीकारणे बंद करून ई-मेलवर कार्यालयीन पत्रव्यवहार करण्याच्या लेखी सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

केंद्र व राज्य शासनाने शासकीय व निमशासकीय कार्यालयीन कामकाजासाठी खासगी कंपन्यांचे ई-मेल आयडी वापरण्यास बंदी घातली आहे. शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांचे खासगी कंपन्यांचे ई-मेल आयडी कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यास बंदी घातली आहे, असे असतानाही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी जीमेल या खासगी कंपनीचे सर्व ई-मेल आयडी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज व नागरिकांची माहिती खासगी कंपनीकडे जाऊन नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होणार आहे. महापालिकेचे बहुतांश विभागाचे कामकाज अद्यापही ऑनलाईन झालेले नाहीत. महापालिकेच्या वेबसाईटवरील माहितीही अद्ययावत नसून, वेबसाईट वारंवार बंद असते. नागरिकांनी वेबसाईटवरून केलेल्या तक्रारीस कधीही उत्तर दिले जात नाही. सर्वच नागरिक ई-मेलचा वापर करण्यास सक्षम नाहीत. महापालिकेचे कर्मचारीही ई-मेलद्वारे कामकाज करण्यास सक्षम नाहीत. नागरिकांचे अर्ज, निवेदन, तक्रार, माहिती अधिकार अर्ज स्वीकारणे बंद केल्याने त्यांच्या समस्यांचे, तक्रारींचे निवारण होणार नाही.

कोविडच्या कारणाने टपाल व बारनिशी बंद करून नागरिकांचे अर्ज, तक्रार, माहिती अधिकार अर्ज न स्वीकारणे हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांची गळचेपी आहे. रजिस्टर पोस्टाने येणाऱ्या कायदेशीर नोटिसा, कोर्ट समन्स, शासकीय पत्रव्यवहार टपाल शाखा व बारनिशी बंद असल्याने स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे कामे प्रलंबित राहणार आहेत.

मंत्रालय ते ग्रामपंचायतीपर्यंत सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील टपाल व बारनिशी विभाग सुरू असताना फक्त महापालिकेने हे विभाग का बंद केल्याने यामागील हेतू शुद्ध नसल्याचा आरोपही संघर्ष समितीचे तानाजी रूईकर व पदाधिकाऱ्यांनी केला आहे.