शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका नदाफ यांचे पद कायम

By admin | Updated: October 6, 2015 00:36 IST

पोटनिवडणूक रद्द : भाजपच्या गटात सामील; राष्ट्रवादीला आणखी धक्का

तासगाव : तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. आयेशा नदाफ यांचे अपील मान्य करत नगरविकास विभागाने नगरसेवक पद कायम ठेवले. त्यामुळे प्रभाग एकमधील पोटनिवडणूक रद्द झाली आहे. मात्र नगरसेविका नदाफ यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचे पद राहिले तरी, पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा हादरा बसला असून राष्ट्रवादीची टिकटिक केवळ एका नगरसेवकापुरतीच राहिली आहे.माजी गृहमंत्री आर. आर. पाटील गटाच्या नगरसेविका डॉ. आयेशा नदाफ सलग सहा महिने सर्वसाधारण सभेसाठी गैरहजर राहिल्या होत्या. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी दीड वर्षापूर्वी खासदार संजयकाका पाटील गटाच्या नगरसेवकांनी नगरपालिकेच्या सभेत ठराव केला होता. त्यानुसार नगरसेविका नदाफ यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून पद रद्द करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून नदाफ यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला आहे. त्यानुसार १३ ते १७ आॅक्टोबरदरम्यान अर्ज दाखल होणार होते, तर १ नोव्हेंबरला मतदान होणार होते. तत्पूर्वी डॉ. नदाफ यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार डॉ. नदाफ यांचे नगरसेवक पद कायम ठेवण्यात आले. डॉ. आयेशा नदाफ यांचे पद रद्द व्हावे, यासाठी खासदार संजयकाका गटाच्या नगरसेवकांनीच पुढाकार घेतला होता. वर्षभरापासून त्याबाबत पाठपुरावा सुरु होता. मात्र काही दिवसांपासून काका गटाच्या नगरसेवकांनीच डॉ. नदाफ यांचे पद कायम राहावे, यासाठी पुढाकार घेतला होता. आता डॉ. नदाफ यांचे पद कायम राहिले असले तरी, त्यांनी खासदारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काका गटाच्या नगरसेवकांनी खेळलेली खेळी यशस्वी ठरली असून पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी आणखीनच गोत्यात आली आहे. (वार्ताहर)घटनाक्रमनगरसेविका डॉ. आयेशा नदाफ दीड वर्षापूर्वी सलग सहा महिने सभांना गैरहजरकाका गटाच्या नगरसेवकांकडून रजा अर्ज मंजुरीला विरोध, पद रद्द करण्यासाठी हालचालीनगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव काका गटाच्या नगरसेवकांच्या बाजूने मंजूरखासदार संजयकाका समर्थक अनिल कुत्ते आणि काँग्रेसचे नगरसेवक संजय पवार यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्यत्व रद्दसाठी याचिकाजिल्हाधिकाऱ्यांकडून डॉ. नदाफ यांचे नगरसेवक पद रद्दचा निर्णयडॉ. नदाफ यांच्याकडून उच्च न्यायालयात अपीलउच्च न्यायालयाकडून स्थगिती न मिळाल्याने पोटनिवडणूक जाहीरडॉ. नदाफ यांच्याकडून नगरविकास विभागाकडे अपील सोमवारी डॉ. नदाफ यांच्याबाजूने नगरविकास विभागाचा निर्णय.नगरसेवक पदाबाबत आमची भूमिका योग्य असल्याचे नगरविकास विभागाच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले आहे. पालिकेवर खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. राज्यातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी यापुढे आमची वाटचाल भाजपसोबतच असेल. यापुढे खासदार संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार काम करू. - डॉ. आयेशा नदाफ, नगरसेविका, तासगाव