शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलणार

By admin | Updated: December 24, 2014 00:22 IST

संपतराव पवार : आभाळमाया फौंडेशनच्या सहकार्याने हिवतडमध्ये पहिला प्रयोग

सांगली : पाणी आणि फळशेती यांचे सूत्रबध्द नियोजन करून उजाड माळ वृक्षाच्छादित करणे शक्य आहे. सांगलीतील आभाळमाया फौंडेशनच्या सहकार्याने हिवतड (ता. आटपाडी) येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यात दहा शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती पथदर्शी प्रकल्पाचे समन्वयक संपतराव पवार यांनी दिली.पवार म्हणाले की, महाराष्ट्रात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या घटना घडण्यास निसर्ग कारणीभूत आहे, धोरण कारणीभूत आहे, की नियोजन कारणीभूत आहे, हे पडताळून पाहण्याची गरज आहे. दुष्काळी भागाचा प्रमुख आधार पशुधन आहे. प्रत्येक टंचाईच्या काळात चाराटंचाई तीव्र होते, हा अनुभव सतत येऊनही उपाययोजना करणारी एकही योजना शासनाकडे नाही. सोयाबीन, कापूस यासारखी पिके हाती लागली नाहीत, तर शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडतो. झाडे वाळली, तर खात्रीशीर फायदा देणारी फळशेती उद्ध्वस्त होते. शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडून पडते. त्यातून शेतकरी आत्महत्येकडे वळतो. या शेतकऱ्यांना योग्य मार्गावर नेण्यासाठी फळशेती आणि पाणी यांचे सूत्रबध्द नियोजन करण्याचे धोरण ठरविले आहे. यातूनच हिवतड येथील धनाजी मंडले, हणमंत मंडले, सुनीता मंडले, रघुनाथ मंडले, उमाजी मंडले, राजू पोळ, पोपट मंडले, सोपान मंडले, चंद्रकांत मंडले, दीपा मंडले या शेतकऱ्यांचा ‘जय मल्हार ग्रुप’ केला आहे. या शेतकऱ्यांच्या कोरडवाहू एक एकर क्षेत्रात डाळिंब लागवड केली जाणार आहे. डाळिंबाच्या प्रत्येक झाडास दरवर्षी पुरेसे म्हणजे ४०० लिटर पाणी पुरविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बागेमध्ये शंभर टक्के सेंद्रीय खताचा वापर केला जाणार आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक क्षेत्रास दोन हजार लिटर पाणीसाठा करण्यासाठी टाकी, होजपाईपद्वारे प्रत्येक झाडास पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. एक एकर डाळिंब बागेसाठी चाळीस हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाचीही शेतकऱ्यांनी तयारी दर्शविली असून २८ डिसेंबर रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे. सांगलीतील आभाळमाया फौंडेशनचे प्रमोद चौगुले, निसर्ग प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र व्होरा, सेंद्रीय शेतीतज्ज्ञ जयंत बर्वे, पर्यावरणतज्ज्ञ अजित तथा पापा पाटील आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची तयारी दर्शविली आहे. (प्रतिनिधी)शेतीचे व्यवस्थापनखात्रीशीर पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे शेती तोट्यात हे खरेच आहे. पण, शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास पाण्याचा प्रश्न निश्चित सुटू शकतो. म्हणूनच डाळिंब बागेतील प्रत्येक झाडाला किती पाणी लागणार आहे, याचे नियोजन करून तेवढे पाणी टाकीत साठवून ठेवण्याचे शेतकऱ्यांना धडे देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.