शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पालकत्वाचे ‘शिवाळ’ जयंत पाटील यांच्या खांद्यावर!

By admin | Updated: May 24, 2016 00:53 IST

विटा कोणाचे? : सदाभाऊंच्या गुगलीने नेते अवाक्

दिलीप मोहिते --विटा -मुत्सद्दी राजकारणी माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी विट्यात खानापूर मतदार संघातील परस्परविरोधी सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर आणून ‘जयंतनीती’चा वापर केला, पण कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी मात्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत राजकीय पालकत्वाचे ‘शिवाळ’च त्यांच्या खांद्यावर ठेवले. जयंतरावांच्या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे ‘वावटळ’ उठवून सदाभाऊंनी ‘कदम’ कॉँग्रेसवरही निशाणा साधला.येथे राजारामबापू बॅँकेच्या शाखेचे उद्घाटन शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांच्याहस्ते झाले. यावेळी सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते. सदाभाऊ वगळता सर्वजण पूर्वीचे राष्ट्रवादीचेच नेते! पण पक्ष बदलला म्हणून व्यक्तिगत संबंध कधी बिघडत नाहीत, असे सांगत जयंतरावांनी त्यांना एका व्यासपीठावर आणले.जयंतरावांच्या हाकेला हाक देणाऱ्या दिग्गजांच्या सदाभाऊ नवखेच! त्यांनी राजारामबापू व लोकनेते हणमंतराव पाटील यांच्यातील संबंधांचा लेखाजोखा मांडला. त्यानंतर त्यांनी जयंतरावांवर कौतुकाचा वर्षाव करत खानापूर मतदारसंघाच्या नैतिक, सामाजिक व राजकीय पालकत्वाचे ‘शिवाळ’ जयंतरावांच्या खांद्यावर ठेवले. त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे सांगून राजकीय क्षेत्रात वावटळ उठविले. बाहेरच्या लोकांसाठी विटा धार्जिण असल्याचेही सांगितले. या वक्तव्यानंतर विटा नगरपरिषदेसाठी मोर्चेबांधणी करणारे आ. बाबर यांच्यासह उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे सदाभाऊंना आ. बाबर यांच्याकडे पाहत ‘बाहेर’च्या म्हणजेच ‘जिल्ह्याबाहेर’च्या लोकांसाठी विटा धार्जिण असल्याचे सांगावे लागले.तुम्ही आमचेच आहात!राजेंद्रअण्णांनी, सर्व वक्रीय ग्रह जयंतरावांनी एका व्यासपीठावर आणल्याचे सांगितले. आ. बाबर यांनी तर, जिल्ह्यातीलच काय, राज्यातील सर्वपक्षीय नेते एका व्यासपीठावर आणण्याची धमक जयंतरावांत असल्याचे सांगितले. त्यानंतर, पक्ष बदलला म्हणून व्यक्तिगत संबंध बिघडत नाहीत. झाडाने सावली दिली नाही म्हणून आपण त्याच्यावर रागवायचे नसते. कारण ते अन्य कोणाला तरी सावली देतच असते, असे सांगून, राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या नेत्यांना, ‘तुम्ही आमचेच आहात’, असे सांगण्याचा प्रयत्न जयंतरावांनी केला.