शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या हातावर तुरी; महिलेचे पलायन

By admin | Updated: October 31, 2014 01:12 IST

गुरुवारी रात्री ही घटना घडली.

सांगली : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एका संशयित चोरट्या महिलेने चक्क शहर पोलीस ठाण्यातून ‘फिल्मी स्टाईल’ने धूम ठोकली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. घटनेनंतर या महिलेस पकडून देणाऱ्या नागरिकांनी पोलिसांच्या वर्तणुकीबद्दल संताप व्यक्त केला. नागरिक चोर पकडून पोलिसांकडे देतात आणि पोलीस चोरास सोडून देतात, असा त्यांनी आरोप केला.याबाबत अधिक माहिती अशी की, पंचमुखी मारुती रस्त्यावर कपडे विक्रीचे दुकान आहे. आठवड्यापूर्वी या दुकानात चोरी झाली होती. दुकान मालकाने शहर पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. तोपर्यंत गुरुवारी सायंकाळी दुकानात एक महिला खरेदीच्या निमित्ताने आली होती. यावेळी तिला चोरी करताना मालकाने रंगेहात पकडले. चोरट्या महिलेस पकडल्याचे वृत्त समजताच परिसरातील व्यावसायिकांनी मोठी गर्दी केली होती. या सर्वांनी संशयित महिलेस शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्या कक्षामध्ये या महिलेची चौकशी केली जात होती. तिच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली, त्यावेळी पिशवीत दागिने व अन्य काही चोरीतील वस्तू सापडल्या. पोलीस तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत होते. तोपर्यंत तिने सर्वांची नजर चुकवून ठाण्यातून ‘धूम’ ठोकली. ठाण्यात गर्दी होती. कोण पळून जातंय, हे कोणाला समजले नाही. संशयित महिला पळून गेल्याचे समजताच पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता. (प्रतिनिधी)