शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात भाजी विक्रेत्यांच्यावर पोलिसांकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST

फोटो-३००४२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर न्यूज बहे रोडवरील मुख्य रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांच्यावर कारवाई करताना पोलीस. अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : ...

फोटो-३००४२०२१-आयएसएलएम- इस्लामपूर न्यूज

बहे रोडवरील मुख्य रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांच्यावर कारवाई करताना पोलीस.

अशोक पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहरात भाजी मंडईच्या नावाखाली रस्त्यावरच बाजार भरतो. यावर पोलिसांनी कारवाई करूनसुद्धा रस्त्यावरील रहदारी कमी होत नाही. त्यामुळे शहरासह परिसरात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील मृत्युदराचा आलेखही वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या सात दिवसांसाठी वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यासाठी निर्णय होण्याची शक्यता आहे.

१५ एप्रिलपासून १ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला होता. यामध्ये सकाळी ७ ते ११ पर्यंत किराणा, भाजीपाला आदी व्यवहार सुरू होते. परंतु शहरातील प्रमुख रस्त्यावर भाजी विक्रेते बसतात. यावर पालिका प्रशासनाने वेळोवेळी निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा रस्त्यावरील गर्दी हटली नाही. ३० एप्रिल रोजी पोलीस आणि पालिका प्रशासनाने भाजी विक्रेत्यांच्यावर कडक कारवाई करून विक्रेत्यांना फिरून आपला माल विकावा, असा आदेश दिला. तरी सुद्धा बहुतांशी विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून असल्याने पुन्हा रस्त्यावर जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहर व परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या तालुक्यात शासकीयसह १४ कोरोना सेंटर कार्यरत असून याठिकाणी ३४५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उर्वरित रुग्ण कोल्हापूर, मिरज येथे उपचारासाठी आहेत. दैनंदिन कोरोनाचा वाढता आलेख पाहता बहुतांशी रुग्ण घरामध्येच उपचार घेत आहेत. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे विनाकारण रस्त्यावर फिरून कोरोनाला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे सर्वच प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

चौकट

तीन दिवसात ३० बळी

जिल्ह्यात वाळवा तालुक्याचा मृत्युदर अधिक असल्याचा दिसून येत आहे. बुधवार दि. २८ ते ३० एप्रिल सकाळी ११ वाजेपर्यंत ३० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये इस्लामपूर शहरातील ६ जणांचा समावेश असून उर्वरित वाळवा तालुकासह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील रुग्ण आहेत. ही परिस्थिती आता हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे येणारे सात दिवस कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.