शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यातील चार तलावांत विषारी मांगूर मासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पासह करमाळे, पाडळी, शिवणी तलावांत विषारी आणि माणसांसाठी घातक असलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पासह करमाळे, पाडळी, शिवणी तलावांत विषारी आणि माणसांसाठी घातक असलेला मांगूर मासा आढळून आला आहे. तो समूळ नष्ट करणे अवघड झाले आहे. दुर्घटना होण्याअगोदरच शासनाने हे मासे नष्ट करावेत, अशी मागणी होत आहे.

काही शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासाठी मत्स्यबीज आणले. मात्र, संबंधित व्यापाऱ्याने त्यांना फसवून मांगूर माशांचे बीज दिले. ही लहान पिल्ली असल्याने त्यावेळी लक्षात आले नाही. त्यांनी बीज पाण्यात सोडले. ती पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत पुढे सरकत करमाळे, पाडळी, शिवणी तलावांसह आता मोरणा धरणामध्ये आली आहेत.

हा मासा खाल्यावर कर्करोगासारखे रोग होतात, तसेच जीवितास धोका निर्माण होतो. यामुळे त्याच्या विक्रीवर बंदी आहे. हा मासा मांसाहारी असल्याने इतर माशांना खातो. तो मोठा झाल्यास लहान मुले, कुत्रीसुद्धा भक्ष्य करू शकतो. तो समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. मात्र, मोरणा धरणातील पाणी कधीही संपत नाही. त्यामुळे येथील हा मासा नष्ट करणे अवघड आहे.

चौकट

येथील काही शेतकऱ्यांची फसवणूक करून हे बीज दिले आहे. हा मासा मांसाहारी आहे. त्यामुळे इतर माशांना तो खातो. तो मोठा झाल्यास या परिसरातील पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या लहान मुले, कुत्री भक्ष्य करू शकतो. शासनाने हा मासा समूळ नष्ट करावा.

- महादेव कदम,

उपाध्यक्ष ,

महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, मुंबई