शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
2
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
3
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
4
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
5
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
6
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
7
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
8
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
9
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
10
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
11
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
12
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
13
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
15
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
16
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
17
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
18
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
19
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
20
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ

दराच्या षड्यंत्राने द्राक्ष हंगाम कडवट

By admin | Updated: March 9, 2017 23:21 IST

उत्पादकांना चिंता : अनुकूल वातावरण असूनही तासगाव तालुक्यात दलाल, व्यापाऱ्यांमुळे फटका

प्रदीप पोतदार ल्ल कवठेएकंदयंदा तासगाव तालुक्यातील द्राक्षपट्ट्यातील शेतकऱ्यांना हवामानाने तारले आहे. त्यामुळे यंदा द्राक्षांचा गोडवा अधिक वाढला आहे. गतवेळच्या तुलनेत औषध फवारणी कमी प्रमाणात करावी लागली आहे. पोषक हवामानामुळे द्राक्ष उत्पादनात वाढ झाली आहे. परंतु एकाचवेळी बहुतांशी द्राक्षमाल काढणीला आला असल्याने द्राक्ष दलाल व व्यापारी मंडळींकडून होणाऱ्या दराच्या षड्यंत्रामुळे आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता, येत्या पंधरवड्यात द्राक्षदर सुधारण्याची शक्यता आहे. बदलते हवामान, द्राक्ष दराची जाणीवपूर्वक घसरण अशा नैसर्गिक व कृत्रिम समस्यांचा मुकाबला शेतकऱ्यांना करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा मात्र हवामानाची पोषक साथ लाभल्याने औषध फवारणीच्या खर्चात बचत झाली आहे. तसेच पोषक वातावरणामुळे द्राक्ष उत्पादनातही वाढ झाली आहे. सध्या थंडी संपून उन्हाचा पारा चढू लागल्याने बाजारात द्राक्षांना मागणी वाढतच आहे. किरकोळ विक्रेते, दलाल यांच्याकडे स्थानिक ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. त्यामुळे द्राक्षांची गोडी वाढत आहे. पण प्रत्यक्षात उत्पादक शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दर मिळत नाही. सध्या १२० ते २२०-२६० रूपये प्रति चार किलोस दर मिळत आहे. एकाचवेळी छाटणी घेतलेल्या बागांमधील द्राक्षे काढणीला आली असल्याने दराची कृत्रिम घसरण झाली आहे. अशामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीकडे कल ठेवला आहे. चोरोची, ढालगाव पट्ट्यातील बेदाणा रॅकवर द्राक्षमाल पाठवला जात आहे. द्राक्ष हंगामाच्या लगबगीमुळे तासगावतील सावळज, डोंगरसोनी, मणेराजुरी, कवठेएकंद, तसेच सोनी, मालगाव, आरग, कवलापूर भागात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे.यंदा गोडी अधिकच...गतवेळच्या तुलनेत यंदा हवामानाची साथ मिळाली असल्याने द्राक्षांच्या उत्पन्नात ४० टक्केपर्यंत वाढ झाली आहे, तसेच औषध फवारणीसाठीही कमी खर्च झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत झाली आहे. त्यामुळे द्राक्षांची गोडी अधिक असल्याचे चित्र आहे. पुढील आठवड्यासाठी द्राक्षांना मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे दर तेजीत राहून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.द्राक्षपंढरीतही हमीभावाची उणीव तासगाव ही द्राक्षपंढरी. तरीही हमीभाव मिळत नाही. तसेच बहुतांशी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असतात. दर पाडले जाऊन आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. शेतकऱ्यांना निसर्गाकडून आणि व्यापाऱ्यांकडूनही फसवणूक होत असते. याबाबत जागरूकता निर्माण केली पाहिजे. कृषी विभागाने तसेच प्रशासनाने पिकांच्या दराबाबत किंवा द्राक्ष व बेदाणा यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बागायतदारांना मार्गदर्शन द्राक्षपंढरीमध्ये बागायतदारांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध मार्गानी त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. बाजारभावाबरोबरच तिथे पाण्याचीही समस्या आहे. याबरोबरच आरफळ, म्हैसाळ, पुणदी उपसा सिंचन अशा योजना राजकीय हस्तक्षेप न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी चालविणे महत्त्वाचे आहे. तरच जिगरबाज शेतकऱ्यांसाठी द्राक्षशेती संजीवनी ठरणार आहे. याबाबत दीर्घकालीन उपाययोजना व जलजागृती कार्यक्रम हाती घेऊन प्रबोधनातून टंचाई निवारणाची गरज आहे. अशाप्रकारे मार्गदर्शन झाले तरच द्राक्ष उत्पादकांना फायदेशीर ठरणार आहे.