शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईनद्वारेच शेतीला पाणी हव

By admin | Updated: July 27, 2014 23:59 IST

डोंगरवाडी संघर्ष समिती : मतदानावरील बहिष्कार कायमे

सोनी : वन विभागाच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी, अजून अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी डोंगरवाडी योजनेचे उद्घाटन करून या भागाला आशेवरच ठेवले आहे. त्यामुळे आम्हाला उद्घाटनाच्या नारळातील पाणी नको, तर कालव्याचे पाणी पाईपलाईनमधून शेतकऱ्यांच्या शेतात आलेले पहायचे आहे, असे मत या संघर्ष समितीचे समन्वयक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. पाटील म्हणाले की, सोनीसह परिसराला म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजनेतून पाणी मिळावे यासाठी गेल्या महिन्याभरापासून डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने या योजनेच्या कामाला गती येऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वनजमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे व त्या ठिकाणी काम चालू करून पाणी देण्यातील अडचण सुटली आहे. पण या एकाच समस्येनंतर शेतकऱ्यांना पाणी मिळाले असे नसून पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेपर्यंत हा आमचा लढा चालूच राहणार असून तोपर्यंत मतदानावर बहिष्काराचा निर्धार कायम असणार आहे व त्यासाठी ही संघर्ष समिती लढा देतच राहणार आहे.आतापर्यंत अनेक नेत्यांनी या योजनेचे नारळ फोडले असून अवघ्या सहा महिन्यात पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण याला आज १५ वर्षे लोटली तरी पाणी मिळाले नसल्याने, नेत्यांच्या आश्वासनाला आम्ही बळी न पडता पाणी मिळेपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहे, असे मत यावेळी अरविंद पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी सतीश जाधव, चंपाताई जाधव, रमेश कदम, उल्हास माळकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)पाणी बांधापर्यंत पोहोचेपर्यंत लढामागील महिन्याभरापासून डोंगरवाडी उपसासिंचन योजनेच्या संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने या योजनेच्या कामाला गती येऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वनजमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्या ठिकाणी काम चालू करून पाणी देण्याची समस्या सुटली आहे. पण या एकाच समस्येच्या सोडवणुकीनंतर शेतकऱ्यांना पाणी मिळाले असे नसून, पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेपर्यंत हा आमचा लढा सुरु राहणार असून तोपर्यंत मतदानावर बहिष्काराचा निर्धार कायम असणार आहे, असा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.