सांगली : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगलीत पुन्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. पेट्रोल ४४.६७ पैशांनी महाग झाले असून, बुधवारी १०६.०२ रुपयांवर पोहोचले तर डिझेलच्या दरात १७ पैशांनी वाढ झाली.
जून महिन्यात सांगली जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली होती. आता दररोज इंधनाचे दर वाढू लागल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. जुलै महिन्यातही पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ कायम आहे. दि. २ व ३ जुलै रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यानंतर पुन्हा दरवाढ सुरू झाली. दि. ५ व ६ जुलैला पेट्रोलचा दर १०५.६९ रुपये तर डिझेल ९५.२५ रुपये इतके होते. बुधवारी त्यात आणखी वाढ झाली. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.
चौकट
आठवड्यातील स्थिती पेट्रोल
१ जुलै : १०४.६८
२ जुलै : १०५.०२
३ जुलै : १०५.०२
४ जुलै : १०५.३५
५ जुलै : १०५.६९
६ जुलै : १०५.६९
७ जुलै : १०६. ०२
डिझेल
१ जुलै : ९५.०६
२ जुलै : ९५.०६
३ जुलै : ९५.०६
४ जुलै : ९५.१२
५ जुलै : ९५.२५
६ जुलै : ९५.२५
७ जुलै : ९५.४२