शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

आमराईबाबत हरित न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST

सांगली : शहरातील आमराई उद्यानाचा व्यावसायिक वापर थांबवावा. तेथील नैसर्गिक सौंदर्याला बाधा येऊ नये ...

सांगली : शहरातील आमराई उद्यानाचा व्यावसायिक वापर थांबवावा. तेथील नैसर्गिक सौंदर्याला बाधा येऊ नये या मागणीसाठी सांगली जिल्हा संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालय व हरित न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत न्यायालयाने नोटीसा बजावल्या असल्याची माहिती समितीचे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण, तानाजी रुईकर यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली.

ते म्हणाले की, महापालिका प्रशासनाने आमराईत ट्रेन सुरू करण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. तसेच अंतर्गत विकासाची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे आमराईच्या मूळ नैसर्गिक सौंदर्याला बाधा येणार आहे. मिरजेतील डॉ. आंबेडकर उद्यानामधील मिनी ट्रेन वर्षानुवर्षे बंद अवस्थेत आहे. त्याचा काहीही वापर होत नाही. असे असताना आमराईमध्ये लहान मुलासाठी ट्रेन सुरू करण्याबाबत प्रशासनाची कार्यतत्परता हा चर्चेचा विषय झाला आहे.

महापालिकेने आमराईचा व्यावसायिक वापर करण्याबाबत केलेला ठराव बेकायदेशीर आहे. नागरिकांच्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

आमराई बगीचा हा शहराचा ऑक्सिजन निर्माण करणारा कारखाना आहे. तेथे विविध प्रकाचे दुर्मीळ वृक्ष, पक्षी आणि फुलपाखरे आहेत. याची दखल आंतरराष्ट्रीय शोधनिबंधातून घेतली गेली आहे. कोणतीही नैसर्गिक आणि पर्यावरणास हानी करणारी कृती महापालिकेने करू नये आणि आजपर्यंत झालेली हानीची भरपाई करून आमराईच्या नैसर्गिक साधनसंपत्ती कायम राखावी म्हणून समितीच्यावतीने तानाजी राईकर यानी राष्ट्रीय हरित न्यायालयात तर रवींद्र चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगितले.

यावेळी इर्शाद पालेगार, अ‍ॅड. श्रीकृष्ण पोतकुळे, अ‍ॅड. दीपक नांगरे-पाटील, अ‍ॅड. विनय पाटील, गोरख वनखडे, आसिफ मुजावर, संतोष कदम, रवींद्र ढोबळे, सुनील गिड्डे, राजु ऐवळे, महेश जाधव, प्रसाद मोहिते, मुकुंद भोरे, विनायक ओलेकर, शकील शेख, योगश वडेरा उपस्थित होते.

चौकट

ॲड. ओंकार वांगीकार म्हणाले की, हस्तांतर कराराचा मूळ उद्देश हा पर्यावरणाचे रक्षण आणि वृध्दी हा असताना महापालिकेने आमराईतील नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास करून पर्यावरणाची हानी केली आहे. ही सरळ सरळ कराराचा भंग करणारी कृती आहे. या कृतीबददल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी हरित न्यायालयात केली आहे.