शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

देशासाठी जिल्ह्याने दिले दीडशेजणांचे बलिदान

By admin | Updated: January 26, 2015 00:36 IST

पाच शहीद : नऊ हजार सैनिकांचे योगदान; देशप्रेमाच्या परंपरेत ऐतिहासिक कामगिरीने सांगलीचे नाव कोरले

अंजर अथणीकर / सांगलीस्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी सांगली जिल्ह्यातील दीडशे जवानांनी बलिदान दिले आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुध्द केलेल्या चळवळीत पाचजण शहीद झाले आहेत. आज सांगली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार सैनिक कार्यरत असून, ७३ जणांनी सैन्यदलातील विविध सन्मान पटकावले आहेत. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान, चीन व श्रीलंकेमधील बंडखोरांबरोबर झालेल्या युध्दात, तसेच अतिरेक्यांबरोबर झालेल्या लढ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील दीडशे जवानांनी आजपर्यंत बलिदान दिले आहे. देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आजपर्यंत विविध पदकांनी ७३ जणांना सन्मानित करण्यात आले आहे. १९७१ मध्ये पाकबरोबर झालेल्या युध्दात शहीद झालेले मणेराजुरीचे जवान पांडुरंग साळुंखे यांना मरणोत्तर महावीरचक्र पदक देऊन गौरविण्यात आले. सांगली जिल्ह्यात आजपर्यंत वीरचक्र पदकाने ८, शौर्य पदकाने १, सेना, नौसेना पदकाने २७, युध्दसेवा पदकाने १, अतिविशिष्ट सेवा पदकाने ५ व मिशन इन डिस्पॅच शौर्य पदकाने ३० जवानांना सन्मानित करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील माजी सैनिकांची संख्या १३ हजार ५५२ इतकी असून, दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या ४ हजार ८८७ इतकी आहे. दुसऱ्या महायुध्दातील हयात सैनिकांची संख्या ३४७, तर दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या ११६८ आहे. सीमेच्या रक्षणासाठी आज सांगली जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार ते ९ हजार सैनिक कार्यरत असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले यांनी दिली. स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब पाटील यांनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व चळवळीतही सांगली जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे. सुमारे पाच हजारहून अधिक ज्ञात, अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी चळवळीत सहभाग घेतला. ब्रिटिशांविरुध्द पुकारलेल्या युध्दात पाच स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले. यामध्ये अण्णासाहेब पत्रावळे, बाबूराव जाधव, किसन अहिर, शेगाव (ता. वाळवा) येथील पाटील व किर्लोस्करवाडीचे पंड्याजी यांचा समावेश आहे. पाच हजारावरून स्वातंत्र्यसैनिक आता ६० वर स्वातंत्र्य चळवळीत अनेक ज्ञात-अज्ञातांनी सहभाग घेतला. त्यामध्ये सुमारे पाच हजार स्वातंत्र्यसैनिकांना ताम्रपट देण्यात आले. सुरुवातीला जे स्वातंत्र्यसैनिक अपंग, निराधार होते, त्यांना दीडशे रुपये मानधन देण्यात येत होते. १९७० च्या सुमारास स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन योजना लागू करण्यात आली. १९९५ मध्ये स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारस असलेल्या पत्नींची संख्या १९ हजार होेती. आता ही संख्या ६० वर आली आहे. सांगली शहरातील स्वातंत्र्यसैनिकांची संख्या सात आहे. स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या वारस पत्नीस आता अठरा हजारांची पेन्शन देण्यात येते.