शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पलूसला निधी कमी पडू देणार नाही

By admin | Updated: May 25, 2016 00:21 IST

पतंगराव कदम : यशवंत पाणी संस्थेच्या एक्स्प्रेस फिडरचे उद्घाटन

पलूस : पलूसच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. पलूस तालुका देशात अव्वल आहे, असे प्रतिपादन डॉ. पतंगराव कदम यांनी केले. पलूसमध्ये डॉ. पतंगराव कदम यशवंत सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या एक्स्प्रेस फिडरचे उद्घाटन आमदार डॉ. पतंगराव कदम व ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. कदम बोलत होते. कार्यक्रमास आनंदराव मोहिते, समन्वय समिती अध्यक्ष महेंद्रआप्पा लाड, तालुका अध्यक्ष ए. डी. पाटील, माजी सभापती खाशाबा (अण्णा) दळवी, डॉ. पतंगराव कदम शिक्षण संस्थेचे संस्थापक पांडुरंग (तात्या) सूर्यवंशी, पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले, सोनाई ट्रस्टचे संस्थापक गणपतराव पुदाले प्रमुख उपस्थित होते.डॉ. कदम म्हणाले, सत्ता लोकांसाठी असते. पहिल्यापासून वसंतराव पुदाले व पलूसकरांची साथ आहे. त्यामुळेच २० वर्षात सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केले. १९९५ मध्ये शेतकरी पाण्याअभावी कर्जात पिचला होता. ही योजना चालू झाली नसती, तर बाजारपेठ बंद पडली असती. आज पलूस तालुक्याचा देशात लौकिक आहे. पंचायत समितीचे उपसभापती सुहास पुदाले यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. वसंतराव पुदाले म्हणाले, ही पाणीपुरवठा संस्था बंद असताना पलूसमधील शेतकरी अतिशय खडतर परिस्थितीत होता. डॉ. कदम यांच्यामुळे दोनवेळा या संस्थेला नवसंजीवनी मिळाली. शेतकरी वर्गाला कोणतीही आर्थिक झळ पोहोचली नाही.यावेळी पांडुरंग सूर्यवंशी, गणपतराव पुदाले, आनंदराव मोहिते, खाशाबा दळवी, राकेश पाकले, पी. एम. बुचडे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता एम. बी. शेंडगे, पी. एम. बुचडे, पंचायत समिती उपसभापती सुहास पुदाले, तंटामुक्ती समिती अध्यक्ष आनंदराव पुदाले, अनिल शिंदे, गिरीश गोंदील, सांडगेवाडीच्या सरपंच पद्मिनी वडार, उपसरपंच वंदना सांडगे, बाजार समिती सदस्य पोपटराव चव्हाण, कबीर शेख, पलूस बॅँकेचे उपाध्यक्ष शामराव डाके, संचालक प्रकाश पाटील, मार्तंड सदामते, धोंडीराज विकास सोसायटीचे अध्यक्ष डी. के. पाटील, उपाध्यक्ष संजय पवार, वसंतराव पुदाले सह. दूध संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह कदम, ग्रामपंचायत सदस्य मनोहर बुचडे, ऋषिकेश जाधव, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष एल. ए. पाटील उपस्थित होते.उपाध्यक्ष अधिक जाधव, सचिव सदाशिव पवार, माजी अध्यक्ष दत्तात्रय पुदाले, संचालक संभाजीराव पवार, सुनील सूर्यवंशी, रघुनाथ गोंदील, महादेव कचरे, हणमंत कदम, विकास पाटील, प्रकाश फल्ले, अरविंद वाघमारे, सौ. मालन पवार, सौ. सजाबाई मोरे, शंतनुराव कदम, रमेश बुचडे, अभिजित शितापे, कबीर शेख, दामोदर बुचडे, बिभीषण शिंदे यांनी संयोजन केले. सुनील सूर्यवंशी यांनी आभार मानले, अवधूत वागावकर यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)