शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समडोळी ग्रामसेवकाकडून सात लाभार्थ्यांचे पैसे परत

By admin | Updated: June 17, 2015 00:42 IST

सीईओंच्या कारवाईचा परिणाम : खातेनिहाय चौकशी सुरू

सांगली : शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शौचालयाच्या अनुदानावर समडोळी (ता. मिरज) येथील ग्रामसेवक पांडुरंग रोकडे यांनी डल्ला मारला होता. याप्रकरणी सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन तो घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर रोकडे याच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर त्याने मंगळवारी लगेच सातजणांचे पैसे परत केले.समडोळी येथे शौचालय बांधलेल्या कुटुंबांनी अनुदानाची मागणी केल्यानंतर त्यांच्याकडे तीन ते चार हजार रुपये ग्रामसेवक रोकडे मागत आहेत. यासंबंधीची तक्रार जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. माने यांनी ग्रामसेवक पैसे मागत असल्याचे संभाषणच सीईओ सतीश लोखंडे यांच्याकडे सादर केले होते. या तक्रारीची दखल घेऊन सोमवारी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी समडोळी येथे भेट देऊन ग्रामसेवकाच्या गैरव्यवहाराची सत्यता तपासली. त्यानंतर मंगळवारी रोकडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच लिपिक चंद्रकांत गर्जे यांची ग्रामपंचायतीने नियुक्ती केली आहे. यामुळे तेथील त्यांच्या कारभाराची चौकशी करून ग्रामपंचायतीने गर्जे यांच्यावर कारवाईबाबतचा निर्णय घेण्याची सूचना जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला कळविले आहे.रोकडे यांच्यावर कारवाई होताच त्याने मंगळवारी सातजणांचे पैसे परत केले. उर्वरित लाभार्थ्यांचा शोध घेऊनही पैसे देण्याची त्याची तयारी असून, कारवाई मागे घेण्यासाठी त्याचे प्रशासनाकडे प्रयत्न सुरु होते. दरम्यान, २०१४-१५ या वर्षासाठी समडोळी गावातील ११० कुटुंबांनी ३१ मार्च २०१५ रोजी काम पूर्ण झाल्याचे दाखले जोडून अनुदानासाठी प्रस्ताव पाठविला होते. त्यापैकी ७ मे २०१५ रोजी ५० कुटुंबियांना, तर २१ मे २०१५ रोजी उर्वरित ६० कुटुंबांना अनुदानाचे धनादेश दिले आहेत.धनादेश देताना कुटुंब प्रमुखांबरोबर ग्रामसेवक स्वत:ही बँकेत जात होते. तेथे लाभार्थ्यांकडून तीन ते चार हजार रुपये काढून घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. (प्रतिनिधी)जुने शौचालय दाखवून अनुदान लाटण्याचा उद्योगग्रामसेवकांना हाताशी धरून काही कुटुंबांनी जुन्या शौचालयाच्या नावाखाली बारा हजार रुपयांचे अनुदान लाटण्याचा काही गावामध्ये प्रकार सुरु आहे. कुटुंबियांची ही बोगसगिरी उघड न करण्यासाठी ग्रामसेवक तीन ते चार हजार रुपयांची लाच घेत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषद सदस्यांच्या निदर्शनास आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व शौचालय अनुदान वाटपाची चौकशीची त्यांनी मागणी केली आहे.