शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाटस ग्रामपंचायत बरखास्त

By admin | Updated: October 27, 2014 23:00 IST

येथील ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आली असून, या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आला आहे.

अशोक पाटील -इस्लामपूर -लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्याविरोधात आपली भूमिका नरमाईची ठेवत काँग्रेसला उमेदवारी दिली. तेव्हापासून वाळवा-शिराळ्यात राष्ट्रवादीला घरघर लागली आहे. विधानसभेला शिराळा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांना चांगलाच झटका बसला आहे. तर इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील विक्रमी मतांनी विजयी झाले असले तरी, त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या बहुतांशी नेत्यांनी भाजप, शिवसेनेशी घरोबा केला आहे. त्यामुळे आगामी काळात जयंत पाटील यांची भूमिका काय राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.विधानसभा निकालानंतर जयंत पाटील हे अज्ञातवासात गेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिराळा मतदारसंघातील ४८ गावांत राष्ट्रवादीला चांगलाच दणका बसला आहे. याच परिसरातील कुरळपचे पी. आर. पाटील यांच्याकडे राजारामबापू सह. साखर कारखान्याची धुरा आहे. वाटेगावचे रवींद्र बर्डे वाळवा पंचायत समितीचे सभापती आहेत. तांबव्याचे नेताजी पाटील यांना राजारामबापू दूध संघाचे अध्यक्षपद दिले आहे. याच गावचे लिंबाजी पाटील हे जि. प. चे उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. कासेगाव शिक्षण संस्थेवर कासेगावचेच शामराव पाटील आहेत. देवराज पाटील यांना कमी वयातच जि. प. च्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. याव्यतिरिक्त राजारामबापू उद्योग समूहात जास्तीत-जास्त कार्यकर्त्यांना संधी देऊनही ४८ गावांत मानसिंगराव नाईक यांना बसलेला फटका जयंत पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नव्याने निर्माण झालेल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना वाळवा-शिराळ्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला होता. तेव्हापासून जिल्ह्यासह राज्यातील त्यांचे नेतृत्व भक्कम होत गेले. त्यानंतर ऊस आंदोलन, सांगली महापालिकेत केलेला शिरकाव, जिल्ह्यातील राजकारणात केलेल्या कुरघोड्यांमुळेच राष्ट्रवादी बॅकफूटवर पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.वाळवा-शिराळा तालुक्यांसह जिल्ह्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी जयंत पाटील यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केलेले प्रयत्न फसले आहेत. काही ठिकाणी मात्र त्यांना यश आले आहे. जयंत पाटील उच्चांकी मतांनी विजयी झाले असले तरी, त्यांना सत्तेत स्थान मिळणार नाही. त्यांच्याच बरोबर काम करणारे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचेही भवितव्य अंधारात आहे.वैभव नायकवडी हुशार..! हुशार नेता म्हणून वैभव नायकवडी यांचे नाव घेण्यास हरकत नाही. ते काळानुसार भूमिका बदलताना दिसतात. कधी नागनाथअण्णांच्या कार्याचा गवगवा करतात, तर कधी काँग्रेसच्या नेत्यांची वाहवा करतात. मध्येच त्यांना राष्ट्रवादीचाही पुळका येतो. यामुळे ते नेमके कोणत्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत, हे कोणीही सांगू शकत नाही. परवा तर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्यासोबत त्यांनी नागनाथअण्णांच्या समाधीस्थळाला भेट दिली. त्यामुळे त्यांचे भाजपवरील प्रेम उफाळले का? असाही सवाल उपस्थित होत आहे. घडतंय ते जयंतरावांमुळेच..!वाळवा-शिराळ्यात काहीही घडो, ते जयंत पाटीलच घडवतात, अशी हवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून जयंत पाटीलच प्रयत्न करणार आहेत. सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवू नये यासाठी पाटील यांचाच डाव आहे. जिल्ह्यातील सर्व समर्थक भाजप, शिवसेनेत घालवण्यात पाटील यांचाच हात आहे. सध्या पाटील यांच्या पाठीशी ९ आमदार असल्याचीही चर्चा तालुक्यात घुमू लागली आहे.वाळवा-शिराळ्यासह जिल्ह्यावर आपली पकड मजबूत करण्यासाठी पाटील यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत केलेले प्रयत्न फसले आहेत. ते उच्चांकी मतांनी विजयी झाले असले तरी, त्यांना सत्तेत स्थान मिळणार नाही.माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचेही भवितव्य अंधारात आहे.