शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पार्टी सांगलीकर नेत्यांची.. हिरमुसले मात्र काेल्हापूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST

कोकरूड : कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील ठरावधारक असलेले सात मतदार दोन वेगवेगळ्या माेटारीतून गुरुवारी चांदोली परिसरात ...

कोकरूड : कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील ठरावधारक असलेले सात मतदार दोन वेगवेगळ्या माेटारीतून गुरुवारी चांदोली परिसरात पर्यटनासाठी दाखल झाले. मात्र त्यापूर्वीच सांगली जिल्ह्यातील काही ‘राजकीय पर्यटकांना’ पोलिसांनी पकडल्याची बातमी पसरली आणि गोकुळच्या मतदारांना आल्या पावली परतावे लागले.

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक सुरी आहेत. ठरावधारक असलेल्या मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी सुरु आहेत. या दूध संघाचे सात ठरावधारक मतदार बांबवडेमार्गे चांदोली परिसरात पर्यटनाच्या निमित्ताने आले होते. एके ठिकाणी ते सर्वजण थांबले असताना सांगली जिल्ह्यातील भाजप, काँग्रेससह अन्य पक्षांचे कार्यकर्ते, दोन अधिकाऱ्यांना चांदोली धरणाच्या पायथ्याशी मद्यधुंद पार्टीमध्ये धिंगाणा करताना कोकरूड पोलिसांनी पकडल्याची बातमी आली. त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे समजताच गोकुळच्या या सात ठरावधारकांनी पर्यटनाचा आनंद घेणे दूरच. मात्र भीतीपोटी आल्या पावली परतीचा रस्ता धरला.

पर्यटनानिमित्ताने आलेल्या गोकुळच्या मतदारांना कसलीच मौजमजा न करता परत जावे लागल्याने त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचीही निराशा झाली.

दरम्यान चांदोली धरणाच्या पायथ्याशी मद्यपार्टी करून धिंगाणा केल्याप्रकरणी तसेच महिलेस अश्लील हावभाव केल्याप्रकरणी महेश कुमार रवींद्र जगताप (रा. सुखवाडी, ता. पलूस), योगेश विजय कुलकर्णी (रा. सागाव, ता. शिराळा), रवींद्र तानाजी सावंत (रा. जत) यांच्याविराेधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मणदूर (ता. शिराळा) येथील महिलेने विनयभंगाची तक्रार दिली आहे. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हेमंत तांबे-वाघ करत आहेत.