शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परब यांचे सचिव खरमाटेंकडे ७५० कोटीची बेनामी मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:31 IST

तासगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांच्या माध्यमातून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर ...

तासगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांच्या माध्यमातून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे यांच्या, तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे. परब यांचे सचिव तथा आरटीओ खरमाटेकडे ७५० कोटीची बेनामी मालमत्ता आहे, असा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी केला.

परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या वंजारवाडी (ता. तासगाव) येथील फार्म हाउसची आणि विट्यातील पाईप कारखान्याची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या भाजपचे नेते मकरंद देशपाडे यांच्यासमवेत आले हाेते. सकाळी साडेदहा वाजता त्यांनी वंजारवाडीस आणि त्यानंतर विट्यास भेट दिली.

खरमाटे यांना ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बाेलावले आहे. याबाबत सोमय्या म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे ईडीच्या अधिकाऱ्यांकडे खरमाटे यांच्या ७५० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आहे. त्याचीच चौकशी सुरू झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचेही काउंटडाउन सुरू झाले आहे. सांगली जिल्ह्यात चार ठिकाणी खरमाटे यांची बेनामी मालमत्ता आहे. एका ठिकाणी १५० एकर जमीन आहे, तर औद्योगिक वसाहतीमध्ये पाच एकर जागेवर एक कंपनी आहे. वंजारवाडी गावात आलिशान फार्म हाउस आहे. या कोट्यवधीच्या बेनामी संपत्तीची पाहणी करण्यासाठी आलो आहे. वंजारवाडी येथील फार्म हाउसची किंमत २० ते २२ कोटी रुपये आहे. परिवहन अधिकारी असे आलिशान फार्म हाउस कसे बांधू शकतो? बेनामी फार्म हाउस खरमाटे यांचेच आहे की परिवहन मंत्री अनिल परब यांचे आहे, हे पाहण्यासाठी आलो आहे.

चौकट :

दोन अनिल जेलमध्ये जाणार

बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे सचिव आहेत. त्यांची बेनामी संपत्ती परब यांचीच असण्याचा दाट संशय आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी ईडी, सीबीआय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार आहे. ठाकरे सरकारचा एक अनिल (माजी गृहमंत्री अनिल देशमुख) जेलच्या दरवाजात उभा आहे, तर दुसरा अनिल (परिवहनमंत्री अनिल परब) जेलमध्ये जाण्याचा मुहूर्त शोधत आहे. हे दोन्ही अनिल लवकरच जेलमध्ये जाणार असल्याचे सोमय्या म्हणाले.