शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पंचनाम्यास मिळाला मुहूर्त

By admin | Updated: June 19, 2015 00:19 IST

कापसाचे नुकसान : शास्त्रज्ञांचे पथक आटपाडीत दाखल

अविनाश बाड-आटपाडी -अखेर राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना आटपाडी तालुक्यातील नुकसान झालेल्या कापसाच्या शेतीची पाहणी करण्यासाठी मुहूर्त सापडला. गुरुवारी या विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पातील डॉ. अधिर आहेर आणि डॉ. नीलेश पवार या शास्त्रज्ञांनी तालुक्यातील कापसाच्या शेतीची पाहणी केली. यंदा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना २० कोटींचा फटका बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली.आटपाडी तालुक्यातील ५०० हेक्टर शेतातील उन्हाळी हंगामातील कापसाची लागवड पूर्णपणे वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कापसाचे बियाणे भेसळयुक्त असल्याने उगवण नीट झाली नाही. उगवणीनंतर ३ महिन्यांत पाच ते साडेपाच फूट उंच वाढण्याऐवजी केवळ फूट-दीड फूटच वाढ झाली. झाडाला २०० ते २५० फुलांऐवजी एखादे फूल लागल्याची तक्रार केली होती. यानंतर कृषी विभागाकडे यातील तज्ज्ञ व्यक्ती नसल्याने त्यांनी राहुरीच्या कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांना पाठविण्यात येईल, असे सांगितले. मात्र तक्रारीनंतर पाच, सहा दिवस कोणीच न आल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर आज (गुरुवारी) राहुरी विद्यापीठाच्या डॉ. आहेर आणि डॉ. पवार यांनी नेलकरंजी, औटेवाडी, धावडवाडी, मानेवाडी, मेटकरीवाडी, पिंपरी, खरसुंडी, निंबवडे येथील वाया गेलेल्या कापसाच्या शेतीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय कृषी अधिकारी जे. जी. कवडे, तालुका कृषी अधिकारी अशोक होलमुखे, कृषी अधिकारी चंद्रकांत माळी उपस्थित होते. या पाहणीबाबत या नुकसानीस कारणीभूत असणारा स्पष्ट अहवाल दोन दिवसात देणार आहे. शास्त्रज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी जे. जी. कवडे यांनी दिली. वादावादी...कृषी शास्त्रज्ञांसाह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक पाहणीसाठी गावोगावी गेल्यानंतर तिथे बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार उपस्थित होते. त्यांची आणि शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी जोरदार वादावादी झाली. आमचा एकरी १५ हजार रुपये खर्च झाला असून, बियाणे उत्पादक कंपन्यांकडून या खर्चासह नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या भागातील शेतकऱ्यांनी कृषीधन कंपनीचे सुपर फायबर ४0७ आणि ग्रीन गोल्ड कंपनीचे कविता या दोनच जातीची लागवड केली आहे. पाहणी केली असता सर्वत्र दोष आढळले. बियाणांमध्ये थोडीफार गफलत आहे, पण ठामपणे आताच सांगता येणार नाही. शेतकऱ्यांच्याही चुका आहेत. त्यांनी हलक्या जमिनीत कापसाची लागवड केली आहे. विद्यापीठाच्यावतीने या भागात ‘नॉन-बी टी’ वाणाची लागवड करावी, अशी शिफारस केली जाते. अन्यथा बी. टी. वाणाची लागवड शेतकऱ्यांनी २५ मे नंतर करावी. - डॉ. अधिर आहेर, शास्त्रज्ञ, राहुरीया भागातील कापसाच्या सर्वेक्षणात शेतकऱ्यांनी मुुख्यत: बी. टी. वाणाच्या दोनच आंतरजातीय वाणाची लागवड केली आहे. अमेरिका आणि इजिप्त येथील वाणांच्या संकरातून उत्पादित केलेले हे वाण आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त राहिल्याने कापसाच्या झाडामध्ये अनेक बदल होतात. हलक्या जमिनीत लागवड केलेल्या ४० ते ५० टक्के कापसाच्या पिकात आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसून आली आहेत. मात्र एकाच निकषावर निष्कर्ष काढता येणार नाही.- डॉ. नीलेश पवार, कृषी शास्त्रज्ञ, राहुरी