शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

पलूसमध्ये सोमवारनंतर लॉकडाऊन पाळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST

पलूस : मिनी लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध नाही, पण सरसकट जो बंद पुकारला, कोणत्याही व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता घेतलेल्या निर्णयाला ...

पलूस : मिनी लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध नाही, पण सरसकट जो बंद पुकारला, कोणत्याही व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता घेतलेल्या निर्णयाला पूर्णपणे विरोध आहे. सोमवार, दि. १२ एप्रिलपर्यंत जर हा निर्णय पाठीमागे घेतला नाही, तर मंगळवारपासून व्यापारी लॉकडाऊन पाळणार नाहीत. सर्व व्यापारी सुरळीत व्यापार चालू ठेवणार आहेत. हवे तर सर्व व्यापाऱ्यांवर शासनाने कारवाई केली तर चालेल, असा निर्णय गुरुवारी पलूस येथील व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत व्यापारी म्हणाले की, व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला असला तरी आज शासकीय नियमांचा आदर राखून दोन दिवस दुकाने बंद ठेवली आहेत. यापुढे कोणताही व्यापारी लॉकडाऊनचा भार सहन करू शकणार नाही. कारण आजवर हा व्यापारीवर्ग नेहमी दुर्लक्षित राहिला आहे. मागील कोरोनाच्या काळात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मदतकार्य केले, पण यावेळी हा व्यापारी पुरता धास्तावला आहे. या व्यापारावर अनेक कुटुंबे अवलंबून असल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. हे लॉकडाऊनचे नियमन करत असताना कर्जाचे हप्ते थांबत आहेत. यामुळे आम्ही मंगळवारपासून शासनाचा कुठल्याही निर्णयाचे पालन करणार नाही. शासनाने लॉकडाऊन करण्याऐवजी शंभर टक्के माेफत औषध उपचार करून नागरिकांना बरे करण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांचीही लॉकडाऊनमध्ये फरफट होत असल्यामुळे आम्ही दोन दिवसांत या निर्णयाच्या विरोधात पाऊल उचलू, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला.

यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कुमार माळी, दिलीप येसुगडे, संभाजी सूर्यवंशी, सोमनाथ होमकर, सुभाष कदम, सयाजी गायकवाड, बाळासाहेब अर्जुन, संदीप सिसाळ, कुमार कांबळे, जगदीश पाटील आदींसह व्यापारी उपस्थित होते.