शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांनी पॅकेज बुडविले!

By admin | Updated: July 27, 2014 00:31 IST

पाच कोटींची थकबाकी : पतसंस्था, संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यास सुरुवात

सदानंद औंधे /मिरजठेवपरतीसाठी शासनाचे पॅकेज घेऊन परतफेड न करणाऱ्या पतसंस्थेवर व संचालकांच्या मालमत्तेवर कार्जाचा बोजा चढविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. मिरज तालुक्यातील २४ पतसंस्थांना दिलेल्या ५ कोटी ३० लाख अर्थसहाय्यापैकी केवळ ४५ लाख वसूल झाले आहेत. दोन थकबाकीदार पतसंस्थांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला आहे. पाच वर्षापूर्वी आर्थिक अडचणीत येऊन बंद पडलेल्या पतसंस्थांतील ठेवीदारांच्या ठेवी अंशत: परत देण्यासाठी शासनाने बिनव्याजी अर्थसहाय्याची घोषणा केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पतसंस्थांना पॅकेजचे वाटप करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याचा दावा करणाऱ्या पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पॅकेज घेतले; मात्र परतफेड केलेली नाही. शासनाच्या अर्थसहाय्यातून प्रत्येक ठेवीदाराला १० हजाराची रक्कम देण्यात आली. शासनाकडून मिळालेले बिनव्याजी अर्थसहाय्य थकित कर्जाची वसुली करुन परतफेड करण्याची अट होती. मात्र पतसंस्था बुडविणाऱ्यांनी गेल्या चार वर्षात शासनाच्या कर्जाची परतफेड केलेली नाही. यामुळे बिनव्याजी अर्थसहाय्याच्या वसुलीसाठी संबंधित पतसंस्थांच्या इमारतीवर व पदाधिकाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचा आदेश सहकार विभागाने दिला आहे. प्रशासक असलेल्या पतसंस्थेच्या मालकीची मालमत्ता नाही व संचालक मंडळही अस्तित्वात नाही अशा पतसंस्थेच्या कर्जदारांच्या तारण मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे. मिरज तालुक्यात २४ पतसंस्थांना ५ कोटी ३० लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले होते. त्यापैकी केवळ चार पतसंस्थांनी २५ लाख रुपये परतफेड केली आहे. अद्याप ४ कोटी ८४ लाख रुपये थकबाकी असल्याने संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. ८ लाख थकबाकीपोटी मिरजेतील विठ्ठल नागरी पतसंस्था व १९ लाख रुपये थकबाकीपोटी तुंग येथील हनुमान ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या इमारतीवर कर्जाचा बोजा नोंद करण्यात आला आहे. उर्वरित थकबाकीदार पतसंस्थांच्या इमारतीवर व संस्था संचालकांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती तालुका उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली.