शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

कर्नाटकातून जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याला कर्नाटकमधील जेएसडब्ल्यू कंपनीकडून ऑक्‍सिजन टँकर उपलब्ध झाला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या सहकार्यामुळे जिल्ह्याला कर्नाटकमधील जेएसडब्ल्यू कंपनीकडून ऑक्‍सिजन टँकर उपलब्ध झाला आहे, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाने गंभीर होणाऱ्या रुग्णांसाठी ऑक्‍सिजनची गरज असते; मात्र सध्या ऑक्‍सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनची गरज भागवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी संपर्क साधून ऑक्‍सिजन उपलब्ध करण्याची विनंती केली होती. त्यानुसार प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटकातील जेएसडब्ल्यू कंपनीशी संपर्क साधून सांगली जिल्ह्यात ऑक्‍सिजन टँकर दिला. इथून पुढे हा ऑक्सिजन टँकरचा पुरवठा असाच सुरू ठेवण्याबद्दलही जेएसडब्ल्यू कंपनीकडून ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना यामुळे दिलासा मिळाला असल्याचेही खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले.