शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन प्लांट दीड महिन्यांत सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST

सांगली : गेल्या महिनाभरापासून सातत्याने चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांट उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला. गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत ...

सांगली : गेल्या महिनाभरापासून सातत्याने चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेल्या महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांट उभारणीला अखेर मुहूर्त मिळाला. गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत ७४ लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली. येत्या दीड महिन्यांत मिरजेतील कोविड सेंटरमध्ये हा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याचा लाभ तिसऱ्या लाटेत होईल, असे सभापती पांडुरंग कोरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला होता. त्यामुळे आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेच्यावतीने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला. मिरज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात महापालिकेचे १२० बेडचे कोवीड सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये प्लांट उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला. कोरोनानंतर हा प्लांट महापालिकेच्या प्रस्तावित रुग्णालयात स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी एका कंपनीशी चर्चा करून तसा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला; पण स्थायी समितीने जाहीर निविदा काढण्याचा ठराव केला. प्रशासनाने सात दिवसांची निविदा काढली पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दोनदा मुदतवाढ देऊनही एकाच कंपनीने निविदा दाखल केली. या साऱ्या प्रक्रियेत महिन्याचा कालावधी लोटला.

मंगळवारी स्थायी समितीसमोर निविदा मंजुरीचा विषय होता. पण सदस्यांनी इतर विषयांवरून गोंधळ घातल्याने सभा तहकुब झाली. परिणामी ऑक्सिजन प्लांट रखडणार की काय, अशी भीती व्यक्त होत होती. अखेर गुरुवारी प्लांट उभारणी व खर्चास मान्यता देण्यात आली. नेमिनाथनगर येथे चिल्ड्रेन पार्क विकसित करण्यासाठी आलेल्या १३ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. पाणीपुरवठा देखभालीसाठी नवीन एजन्सी नियुक्तीपर्यंत गेल्यावर्षीच्या ठेकेदारास अंदाजपत्रकापेक्षा १ टक्का कमी दराने काम करण्यास व खर्चास तसेच महापालिका क्षेत्रातील रस्ते पॅचवर्क करण्यासाठी ५४ लाखांचे दोन व्हायब्रेटर रोडरोलर खरेदीस सभेत मान्यता देण्यात आली. ६० कोटी रुपयांच्या एलईडी पथदिव्यांच्या निविदापूर्व बैठकीमध्ये मक्तेदारांनी उपस्थित केलेल्या शंका व प्रश्‍नांची उत्तरे व दुरुस्त्या वेगवेगळ्या शुद्धिपत्रकान्वये प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्याबाबत स्थायी समिती सभेत चर्चा झाली.

चौकट :

कोरे, आठवलेंचा निर्णय प्रशासनाच्या कोर्टात

लाचप्रकरणी निलंबित महापालिकेचे उद्यान अधीक्षक शिवप्रसाद कोरे तसेच महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी वसुलीची कारवाई रद्दसंदर्भात सभेपुढे अपील दाखल केले होते. त्यावर या दोघांबाबतचा निर्णय प्रशासनाच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे प्रशासनानेच निर्णय घ्यावा, अशी सूचना सभेत करण्यात आली.