शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील हाॅटेल, दुकाने सील न करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रातील व्यापारी, हाॅटेल व्यावसायिकांनी परवाना शुल्काची मुद्दल भरावी, दंड व व्याजासह परवाना शुल्काबाबतचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रातील व्यापारी, हाॅटेल व्यावसायिकांनी परवाना शुल्काची मुद्दल भरावी, दंड व व्याजासह परवाना शुल्काबाबतचा निर्णय लवकरच महासभेत घेतला जाईल, अशी ग्वाही देत महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महासभेचा निर्णय होईपर्यंत व्यापारी, हाॅटेल, दुकाने सील करू नयेत, असे आदेश गुरुवारी प्रशासनाला दिले.

शहरातील व्यापाऱ्यांनी व्यवसाय परवाना शुल्काला विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर विविध व्यापारी संघटनांची बैठक महापौर दालनात झाली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते शेखर माने, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा, सुदर्शन माने, सराफ असोसिएशनचे रणजीत जोग, पंढरीनाथ माने, राहुल आरवाडे, हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचे लहू भडेकर, मिलिंद खिलारे, रेडीमेड व्यापारी असोसिएशनचे शामजीभाई पारेख, कापडपेठ व्यापारी असोसिएशन, गणपतीपेठ व्यापारी असोसिएशन, होलसेल व्यापारी असोसिएशन, बेकरी व्यावसायिक असोसिएशन, होलसेल डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना महापालिका प्रशासनाने व्यवसाय परवाना नोंदणी अनिवार्य केली आहे. जादा फी, जाचक अटी, दंड व व्याज आकारणीसंदर्भात व्यापार्‍यांनी तक्रारी केल्या. व्यवसाय परवाना शुल्कामध्ये मोठी वाढ केली आहे. पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत शुल्क निश्‍चिती केलेली आहे. ती अन्यायी आहे. शुल्कवाढ कमी करावी. व्यवसाय परवाना शुल्क आकारणीला एक वर्षासाठी स्थगिती द्यावी. व्याज, दंड आकारले जाऊ नये, अशी मागणी संघटना प्रतिनिधींनी केली. व्यवसाय परवान्यासाठी अग्निशमन विभागाची परवानगीही अनिवार्य केली असल्याकडे व्यापार्‍यांनी लक्ष वेधले. दरम्यान, याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.

व्यवसाय परवान्यासाठी दुकाने, हॉटेल सील न करण्याचे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी आरोग्याधिकार्‍यांना दिले. सध्या व्यवसाय परवाना शुल्कची मुद्दल भरावी. व्याज व दंड तसेच व्यवसाय परवाना शुल्कचा विषय दरसुधार समितीपुढे ठेवला जाईल. त्यानंतर महासभेत निर्णय घेतला जाईल, असे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.