शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदमधील वादाच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: June 27, 2016 00:33 IST

मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप : त्रिसदस्यीय समिती नियुक्त

सांगली : येथील वालचंद महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून भाजपचे खासदार व जिल्हाध्यक्षांच्या गटात वाद उफाळला आहे. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीला येत्या दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. वालचंद महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून अजित गुलाबचंद यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीत (एमटीई) वाद निर्माण झाला होता. महिन्याभरापूर्वी पृथ्वीराज देशमुख यांनी वालचंद महाविद्यालयाचा ताबा घेतला होता. नियामक मंडळाने रितसर नेमलेले संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड यांची हकालपट्टी करून डॉ. एस. जी. देवमाने यांची नियुक्ती करण्यात आली. चार दिवसांपूर्वी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी महाविद्यालयाचा ताबा पुन्हा परिशवाड यांच्याकडे सोपविला. यावरून खासदार पाटील व जिल्हाध्यक्ष देशमुख या भाजपच्या दोन नेत्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या होत्या. अखेर मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीसाठी कऱ्हाड येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. काडके यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीने दोन्ही गटाला नोटिसा बजावून आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. येत्या दहा दिवसांत समितीचा अहवाल शासनाकडे जाणार आहे. दरम्यान, नोटिसा प्राप्त होताच दोन्ही गटांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागवून घेतली आहे. (प्रतिनिधी)