शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाहतूक वाहनांच्या सर्व्हेचे आदेश

By admin | Updated: July 28, 2014 23:22 IST

दिलीप सावंत : बेकायदेशीर वाहने जप्त करणार, कडक अंमलबजावणी

सांगली : जिल्ह्यात हजारोच्या घरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी वाहने आहेत. ही वाहने आरटीओंकडे नोंदणीकृत आहेत का नाहीत, याबाबत सर्व्हे केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिली. बेकायदेशीर वाहने जप्त करुन पुढील कारवाईसाठी आरटीओंकडे प्रस्ताव पाठविला जाईल, असेही ते म्हणाले.येळावी (ता. तासगाव) येथे स्कूल व्हॅनचालकाने मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे वृत्त आज (सोमवार) ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झाले. जिल्ह्यात अनेक वाहनांतून विद्यार्थ्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असून, वाहनचालकांची चारित्र्य व वैद्यकीय तपासणी केली जात नसल्याच्या गोष्टीवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या वृत्ताची सावंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रश्नी त्यांनी आरटीओ हरिश्चंद्र गडसिंग यांच्याशी चर्चाही केली. सावंत म्हणाले की, पालकांनीही मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी वाहन लावले पाहिजे. मात्र हे वाहन नोंदणीकृत आहे का नाही, याची तपासणी केली पाहिजे. मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. कोणता वाहनचालक कमी पैसे घेतो, हे पाहून त्या वाहनातून सोडण्याकडे पालकांचा कल असल्याचे दिसून येते. त्यांनी तसा विचार करु नये. वाहन व त्यावरील चालकाचे वर्तन चांगले आहे का, याकडे पाहिले पाहिजे. चालक असभ्य वर्तन करीत असल्याचे मुलांनी घरी सांगितले, तर पालकांनी गप्प बसू नये. तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार करावी. (प्रतिनिधी)४ आरटीओ गडसिंग म्हणाले, येळावीत झालेली घटना मनाला चटका लावणारी आहे. ती व्हॅन जप्त केली आहे. संशयित चालकाने विद्यार्थी वाहतुकीचा परवाना घेत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे त्याच्या चारित्र्याचा दाखला कसा मिळणार? पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची माहिती मागविली आहे. ही माहिती मिळताच संशयिताचे ‘लायसन्स’ व वाहनाचा परवाना रद्द केला जाईल.