शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मिरज पंचायत समितीमधील एजंटांना प्रतिबंधाचे आदेश

By admin | Updated: June 18, 2015 00:40 IST

पिळवणुकीस आळा : ग्रामसेवकांकडून कामांचे प्रस्ताव घेणार--लोकमतचा दणका

मिरज : मिरज तालुक्यात मनरेगाच्या कामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी एजंटांनी लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक सुरू केल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. मिरज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना एजंटगीरीला व आर्थिक फसवणुकीला आळा घालण्याच्या व कामांचे प्रस्ताव ग्रामसेवकांच्या माध्यमातून दाखल करुन घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांच्या फसवणुकीबाबत वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पंचायत समितीत उठबस करणारे एजंट गायब झाले होते.मिरज तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या गोठा बांधकाम व विहीर मंजुरीसाठी एजंटांनी परस्पर बाजार मांडत लाभार्थ्यांना लाखोचा गंडा घातला आहे. याबाबत ‘लोकमत’च्या या वृत्ताची मनरेगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत मिरज पंचायत समितीतील रोजगार हमी योजना विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली. संबंधित अधिकाऱ्यांनी फसवणुकीबाबत लाभार्थ्यांकडून तक्रारी येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले. कामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी सुरु असलेली एजंटगीरी व त्यांच्याकडून लाभार्थ्यांची होणारी आर्थिक फसवणूक ही गंभीर बाब असल्याने एजंटगीरीला प्रतिबंध करण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव ग्रामसेवकांच्या माध्यमातून दाखल करुन घ्यावेत व त्यांच्याकडूनच कामांचा पाठपुरावा करण्यात यावा. एजंटांकडून आर्थिक फसवणुकीबाबत प्रकार आल्यास कारवाई करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)