मिरज : येथील मिरज महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरास, बुरखा, स्कार्फ व रूमाल तोंडाला बांधण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आज (सोमवारी) बुरखा बंदीस आक्षेप घेण्यात आल्याने याबाबत लावण्यात आलेला फलक काढण्यात आला. विद्यापीठाच्या सूचनेनुसार शिस्त म्हणून महाविद्यालयाच्या आवारात मोबाईल बंदी, बुरखा, स्कार्फ, रूमाल, मफलर तोंडाला बांधण्यास बंदी, ओळखपत्र, तासाला अनुपस्थिती आदी नियम जाहीर केले आहेत. या नियमांचा फलक महाविद्यालयाच्या आवारात लावला आहे. यापैकी बुरखा बंदीस विरोध केला आहे. मुस्तफा बुजरूक, जाफर शेख, इम्रान मुजावर, इम्रान जमादार, मेहेबूब मणेर यांनी प्राचार्यांची भेट घेऊन बुरखा बंदीस विरोध दर्शविला. महाविद्यालय प्रशासनाने मात्र विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे महाविद्यालयाच्या आवारात बुरखा व स्कार्फ बंदी करण्यात आल्याचे सांगितले. (वार्ताहर)
मिरजेत महाविद्यालयात बुरखा बंदीस विरोध
By admin | Updated: December 23, 2014 00:35 IST