शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

उघड दार देवा आता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST

सांगली : आध्यात्मिक भाववाहिन्याही ब्लॉक करुन कोरोना अजूनही जिल्ह्यात दुसरी लाट घेऊन उभा आहे. काही दिवसांचा अपवाद वगळता गेल्या ...

सांगली : आध्यात्मिक भाववाहिन्याही ब्लॉक करुन कोरोना अजूनही जिल्ह्यात दुसरी लाट घेऊन उभा आहे. काही दिवसांचा अपवाद वगळता गेल्या दीड वर्षांपासून मंदिरांचे दरवाजे सतत बंद आहेत. एकीकडे मंदिरावर अवलंबून असणारे अर्थचक्र थांबले असताना दुसऱ्या बाजूने आध्यात्मिक परंपरेलाही लोक मुकले आहेत. त्यामुळे ‘उघड दार देवा आता’ असा धावा करण्यास सर्वांनी सुरुवात केली आहे.

सांगलीलाही आध्यात्माची मोठी परंपरा लाभल्याने येथे मंदिरे, मठांची संख्या मोठी आहे. सांगलीचे पंचायतन गणपती मंदिर मानाचे व सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिरावर अवलंबून असलेली उलाढालही मोठी आहे. मंदिरांचे पुजारी, कर्मचारी, मंदिर व्यवस्थापन, पूजा साहित्य व अन्य साहित्यांचे विक्रेते या सर्वांच्या आयुष्यातील अर्थद्वारही त्यामुळे बंद झाले आहे. व्यापारी, व्यावसायिकांची दुकाने आता सुरु झाली, मात्र मंदिरावर अवलंबून असणाऱ्यांनी संसाराचा गाडा कसा चालवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिरांचे दरवाजे प्रत्येक अनलॉकमध्ये सर्वात शेवटी उघडले जात असल्याने यावर अवलंबून असणाऱ्यांच्या आयुष्यातील प्रश्नांची कोंडी अधिक तीव्र होत आहे.

चौकट

कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प

सांगलीत पंचायतन गणपती मंदिरासह स्वामी समर्थ मंदिर, मारुती मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर, विश्रामबाग गणपती मंदिर अशा मोठ्या मंदिरांचा समावेश आहे. याठिकाणी दरमहा २.५ कोटींची उलाढाल होत असते. ही उलाढाल गेले वर्षभर ठप्प आहे.

चौकट

खर्च भागविणार तरी कसा

मोठ्या मंदिरांचा महिन्याचा खर्च ५ ते ७ लाख, मध्यम मंदिरांचा २० ते २५ हजार तर छोट्या मंदिरांचा १० हजाराच्या घरात आहे. विद्युत बिल, सेवा-सुविधा, कर्मचाऱ्यांचा पगार, आदी गोष्टींवर हा खर्च होत असतो.

कोट

भाविकांविना मंदिरांची कल्पनाच करवत नाही. कित्येक वर्षांची आध्यात्मिक परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे. नियमांचे पालन करावेच लागेल, पण मंदिरांवर अवलंबून असणाऱ्यांचा प्रश्न तसेच आध्यात्मिक आधाराचा प्रश्नही सुटणे महत्त्वाचा आहे.

- अमोल गिरी, पुजारी, सांगली

कोट

गेल्या दीड वर्षापासून सतत मंदिर बंद आहे. राजगिरा लाडू व अन्य मिठाई साहित्य विक्री करुन आमचे घर चालते. मंदिर बंद असल्याने आमची आर्थिक कोंडी झाली आहे.

- सोपान जाधव, विक्रेते, सांगली

कोट

देवाच्या दारात बसून घर चालवताना कधीही अडचणी आल्या नाहीत. जसे दरवाजे बंद झाले तसे अडचणींनी घर करण्यास सुरुवात केली.

- कमल बरगाले, फुलविक्रेत्या, सांगली