शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टरांची केवळ पाच पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:25 IST

सांगली : जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आजही डाॅक्टर उपलब्ध नसतात. जिल्ह्यात ६२ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, तब्बल १२७ एमबीबीएस ...

सांगली : जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आजही डाॅक्टर उपलब्ध नसतात. जिल्ह्यात ६२ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, तब्बल १२७ एमबीबीएस डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी १२२ पदे भरली असून, केवळ पाच पदे रिक्त आहेत. तरीही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा बहुतांश कालावधी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या बैठकांमध्ये जात असल्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा देण्यात अडचणी येत आहेत.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर डाॅक्टर नियुक्त असले, तरी दुष्काळी तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर डाॅक्टर उपलब्ध होत नाहीत. एकूण रिक्त पदांपैकी शहरी भागातील सर्व पदे भरली असून, दुष्काळी भागाकडे डाॅक्टर जात नसल्याचे आकडेवाडीवरून स्पष्ट होते. शासनाच्या नियमानुसार सर्व आरोग्य केंद्रांवर एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. परंतु सांगली जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने जिल्हा परिषदेतर्फे एमबीबीएस अथवा बीएएमएस डॉक्टरांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील १२७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी एमबीबीएस डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. यापैकी पाच पदे रिक्त असून १२२ एमबीबीएस डॉक्टर कार्यरत असून पाच पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यासारख्या दुष्काळी भागाकडे हे डॉक्टर पाठ फिरवतात. तर सांगली शहरालगत असलेल्या मिरज, तासगाव, वाळवा तालुक्यातील शंभर टक्के रिक्त पदे भरली जातात. यावरूनच डॉक्टरांचा ओढा शहरी व विकसित भागाकडेच राहत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर होत असल्याचे चित्र आहे.

चौकट

पगार आणि कंत्राटी भरतीमुळे एमबीबीएस डॉक्टर मिळताना अडचण

शासनातर्फे एमबीबीएस डॉक्टरांना देण्यात येणारा पगार तुलनेत कमी असल्याने व ही सर्व पदे कंत्राटी बेसीसवर भरली जातात. यामुळेच अनेक एमबीबीएस डॉक्टर जिल्हा परिषदेच्या सेवेत येण्यास तयार नसतात. त्यात दुर्गम भागात जाण्यास देखील टाळाटाळ करतात. तरीही सध्या जिल्ह्यातील एमबीबीएस डॉक्टर रिक्त असण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे, अशी प्रतिक्रिया प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली.

चौकट

एमबीबीएस डॉक्टरांची मंजूर आणि रिक्त पदे

तालुका आरोग्य केंद्रे मंजूरपदे कार्यरत पदे रिक्त पदे

आटपाडी ४ ८ ७ १

जत ८ १६ १५ १

कवठेमहांकाळ ५ १० ८ २

शिराळा ७ १४ १४ ०

वाळवा १२ २५ २५ ०

पलूस २ ६ ६ ०

कडेगाव ४ ८ ८ ०

खानापूर ४ ८ ८ ०

तासगाव ८ १६ १५ १

मिरज ८ १६ १६ ०

एकूण ६२ १२७ १२२ ५.

चौकट

-जिल्ह्यात एकूण प्राथमिक आरोग्य केंद्रे : ६२

-आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टरांची एकूण पदे : १२८

-एमबीबीएस डॉक्टरांची रिक्त पदे : ५

चौकट

उपकेंद्रे बीएएमएस डॉक्टरांच्या हवाली

आरोग्य उपकेंद्रामध्ये बीएएमएस डॉक्टरांचीच नियुक्ती केली जात आहे. उपकेंद्रातील रुग्णांची सेवा बीएएमएस डाॅक्टरांच्याच हवाली केल्याचे दिसत आहे. या डॉक्टरांचीही कंत्राटी पध्दतीने भरती केली जात असल्यामुळे अनेकवेळा उपकेंद्रांमध्ये डॉक्टरांची पदे रिक्त राहतात. यामुळे उपकेंद्रातील रुग्णांना आरोग्य सेवक व सेविकांच्या सल्ल्यावर प्राथमिक उपचार करून गप्प बसावे लागते.