शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वन-वे नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:17 IST

सांगली : दैनंदिन धावपळीत वन-वेच्या नियमांना हरताळ फासण्यात सांगलीकर आघाडीवर आहेत. वाहतुकीचे नियम केवळ नावालाच आहेत, याची वारंवार प्रचिती ...

सांगली : दैनंदिन धावपळीत वन-वेच्या नियमांना हरताळ फासण्यात सांगलीकर आघाडीवर आहेत. वाहतुकीचे नियम केवळ नावालाच आहेत, याची वारंवार प्रचिती येते. विशेषत: शहरातील वर्दळीच्या रस्ते व बाजारपेठेत या नियमभंग करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे वाहतूक पोलिसांनाही त्यावर नियंत्रण ठेवणे अनेकदा शक्य होत नाही. शहरात गावठाण परिसर, मुख्य बाजारपेठा, बसस्थानक, मार्केट यार्डसह काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वन-वे करण्यात आले आहेत. पण वाहनधारकांकडून शिस्त पाळली जात नाही. विशेषत: दुचाकीस्वारांचे बेशिस्ती वाढली आहे.

चौकट

वाहतूक नियमांना ‘खो’

वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांना खो घातला जात आहे. सिग्नल तोडण्यापासून ते वन-वेच्या नियमापर्यंत कुणीच त्याबाबत फारसे गंभीर दिसत नाही. कापडपेठेतील रस्त्यावर तर नेहमीच दुचाकीस्वार वन-वेच्या नियमांचा भंग करत असतात. तीच अवस्था आनंद चित्रमंदिर ते तरुण भारत क्रीडांगण व हरभट रोड ते तरुण भारत क्रीडांगणावरील रस्त्यांची आहे. बसस्थानक परिसरातही वन-वेचा नियम मोडण्याचे प्रमाण अधिक आहे.

चौकट

वाहतूक पोलिसांची कसरत

शहरात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी चौकाचौकांत पोलीस तैनात करण्यात आले आहे. पण रस्ते, चौकांची संख्या पाहता वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करणे शक्य होत नाही. नेमका याचा गैरफायदा वाहनचालक घेत असतात. काहीवेळा वन-वेच्या रस्त्यावर पोलिसांचा तैनात असतात. तर बहुतांश वेळा तिथे पोलीस नसतात.

चौकट

रस्त्यावरच होते पार्किंग

शहरात पार्किंग समस्या दिवसेदिवस गंभीर होत चालली आहे. बाजारपेठेत तर पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने रस्त्यावर वाहने पार्क केली जातात. त्यात दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकानातील माल बाहेरच डिस्प्ले केलेला आहे. मारुती रोडवर हा प्रकार अधिक आहे. दुकानदारासोबतच किरकोळ विक्रेते, भाजीपाला विक्रेत्यांनी रस्ते काबीज केले आहेत.

चौकट

महिन्यात पंधरा हजारांचा दंड वसूल

शहरात वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषत: बाजारपेठेत वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या सहकार्याने नियोजन सुरू आहे. मारुती रोड रस्त्यावर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. हा रस्ता प्रशस्त आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने पार्क होतात. त्यावर शनिवारपासून कारवाईची मोहीम हाती घेणार आहे. वन-वेच्या नियमांचे पालन वाहनचालकांनी करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवरही कारवाई करत आहोत. जानेवारी महिन्यात वन वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पंधरा हजारांचा दंड वसूल केला आहे.