माधळमुठी येथील आशा स्वयंसेविका ललिता भारते या त्यांचे पती दशरथ भारते यांना विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्या व त्यांचे दीर बाबूराव भारते हे दोघेजण दुचाकीवरून (क्र. एम.एच.-१०-ए.यु.-९१३४) लेंगरेमार्गे माधळमुठीकडे जात होते. त्यावेळी ते फोन आल्यामुळे शिवमल्हारनगर येथे लेंगरे रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेले चिंचाळे येथील शिवाजी थोरात यांच्या दुचाकीने (क्र. एम. एच.-१०-डी.जे.-१०५५) ललिता भारते यांच्या रस्त्यावर थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यावेळी थोरात हे रस्त्यावर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ललिता भारते व त्यांचे दीर बाबूराव भारते हे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आशा स्वयंसेविका ललिता भारते यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दुचाकी अपघात चिंचाळेचे एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST