शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये ट्रकखाली सापडून वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST

फोटो-०९जत१ लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत शहरातील संभाजी चौकालगत दर्ग्यासमोर ट्रकखाली सापडून एकजण ठार झाला. सदाशिव कल्लाप्पा व्हनखंडे ...

फोटो-०९जत१

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : जत शहरातील संभाजी चौकालगत दर्ग्यासमोर ट्रकखाली सापडून एकजण ठार झाला. सदाशिव कल्लाप्पा व्हनखंडे (वय ६८ रा. कणसेवाडा, शिवाजी पेठ, जत) असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता घडली. जत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

सदाशिव व्हनखंडे हे मंगळवार बाजार पेठेतून घराकडे येत होते. यावेळी सोलंकर चौकातून संभाजी चौकाकडे ट्रक (एम.एच. ४४. वाय ५७३५) हा ट्रक निघाला होता. संभाजी चौकालगत असलेल्या महीबूब सुभानी दर्ग्यासमोर अरुंद रस्ता आहे. या अरुंद रस्त्यालगत नागरिकांनी दगड टाकले आहेत. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे. या ठिकाणाहून जाताना सदाशिव व्हनखंडे यांना ट्रकचा धक्का लागून ते खाली पडले. यावेळी ट्रकचे पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर ट्रकचालकाने ट्रक तसाच पुढे संभाजी चौक पार करून पुढे नेला होता. परंतु नागरिकांनी त्याचा पाठलाग करून थांबविले. त्यानंतर ट्रकचालकाने ट्रक तेथेच सोडून पलायन केले.

सदाशिव व्हनखंडे हे जत येथे एकटे राहून चर्मकार व्यवसाय करत होते. त्यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले असून, त्यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. तिन्ही मुलींची लग्न झाले असून मुलगा पुणे येथे नोकरी करत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संत रोहिदासनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अर्चना खांडेकर करत आहेत.