शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

'शिराळ्यात जुने राजकारण नव्या वळणावर

By admin | Updated: December 28, 2015 00:29 IST

शिवाजीरावांचे ‘एकला चलो रे’ : विधानसभेपासून दुरावलेल्या दोघा ‘भाऊं’चे ऐक्य

येळापूर : दुष्काळ व पाण्याच्या विषयावरून शिराळा मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून, विधानसभेला वेगळी झालेली दोन भाऊंची युती पुन्हा जुळली असून, यापुढील सर्व निवडणुका एकत्र लढवू, असा संदेश देत मोर्चा काढला, तर आमदार शिवाजीराव नाईक यांनी ‘एकला चलोरे’च्या घोषणेसह कामाला सुरुवात केली आहे.दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ. शिवाजीराव नाईक-भाजप, माजी आमदार मानसिंगराव नाईक- राष्ट्रवादी, तर सत्यजित देशमुख यांनी कॉँग्रेसच्या तिकिटावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यामध्ये शिवाजीराव नाईक यांनी बाजी मारली. त्यानंतर दुरावलेले दोन भाऊ एकत्र येतील की नाही, असे वाटत असतानाच शिराळा बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत या दोघांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.त्यातच वाकुर्डे योजनेचे पाणी करमजाईत सोडण्यात यावे, गिरजवडे मध्यम प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, वाकुर्डे योजनेचे वीज बिल, डाव्या कालव्याची कामे आणि तालुका दुष्काळी करावा आदी विषयांवर सर्व नेत्यांत आरोप-प्रत्यारोपाने संपूर्ण शिराळा मतदारसंघात वातावरण तापले. त्यातच कॉँगे्रस-राष्ट्रवादीने एकत्र येत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत दुष्काळाच्या मुख्य प्रश्नाला हात घातला आणि युती सरकारचे वाभाडे काढले. तालुका दुष्काळी जाहीर व्हायला अजून अवधी लागण्याची शक्यता आहे. विधानसभेला विभागलेल्या दोन भाऊंनी एकत्र येत आमदार नाईक यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, तर आ. शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या माध्यमातून ‘एकला चलो रे’वर भर देत वाटचाल सुरू केली आहे. (वार्ताहर)विविधप्रकारे व्यथा तालुक्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस झालेला आहे आणि खरीप हंगामातील पीक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस व राष्ट्रवादीने स्वतंत्र मोर्चे काढून निवेदने दिली, तर आ. नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. चुकीचा पंचनामा केल्याच्या मुद्यावर जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी पदयात्रा काढून दुष्काळाच्या व्यथा मांडल्या.