शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

घरमालक, उद्योजकांवर गुन्हे

By admin | Updated: January 25, 2015 00:42 IST

कुपवाडमध्ये कारवाई : भाडेकरुंची माहिती लपविली

कुपवाड : घरातील भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यास कळविली नाही म्हणून शहर व परिसरातील अकरा घरमालकांबरोबरच दोन उद्योजकांवर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुख यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली. गुन्हे दाखल झालेल्या घरमालकांमध्ये संजय नारायण शिंदे (रा. श्रीनगर, कुपवाड), रमजान बंदेनवाज मुलाणी (रा. स्वामी मळा, कुपवाड), आण्णाप्पा सिध्दू आवटी, महादेव रामचंद्र काळे, अण्णासाहेब बापू घोडके (तिघेही रा. दत्तनगर, बामणोली), सुरेश गणपती पांडेकर (रा. आंबा चौक, कुपवाड), सत्यवान आबा कोळेकर (रा. इंदिरा हौसिंग सोसायटी, कुपवाड), सिध्दू गोपाळ बंडगर, रघुनाथ हरिबा कराळे (दोघेही रा. सावळी), गजानन श्रीकांत लाड (रा. अहिल्यानगर, कुपवाड), अलतरबी मुसा मुल्ला (रा. खारे मळा, कुपवाड) यांचा समावेश आहे, तर उद्योजकांमध्ये रावसाहेब केदारी माळी (तारा इंडस्ट्रीज, मिरज एमआयडीसी), परेश चंपकलाल शहा आणि विपूल चंपकलाल शहा (योगी कार्पोरेशन, एमआयडीसी कुपवाड) यांचा समावेश आहे. उद्योजकांवर कामगारांची माहिती न दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी शहर व परिसरातील पन्नास सार्वजनिक ठिकाणी आदेशाच्या प्रती भिंतीवर चिकटविल्या होत्या. याप्रकरणी कुपवाड पोलिसांची विशेष पथकेही तैनात झाली आहेत. याबाबत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. मोहीम तीव्र करणार : संजय मेंढे परिसरातील घरमालकांनी आणि औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार त्वरित भाडेकरु व कामगारांची माहिती पोलीस ठाण्यात द्यावी, त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसू शकेल. घरमालक किंवा कारखानदार माहिती देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम आणखी तीव्र करणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.