शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी फोरमसमोर अडथळे

By admin | Updated: July 17, 2014 23:38 IST

विधानसभा निवडणूक : भाजप-सेनेच्या भांडणाचा परिणाम

अविनाश कोळी - सांगलीभाजप-सेनेच्या भांडणामुळे भाजपवर प्रेम असलेल्या दुष्काळी फोरमच्या काही नेत्यांची संभ्रमावस्था वाढली आहे. भाजपवर प्रेम असले तरी, काहींना सेनेशी विवाह करावा लागणार आहे, तर काहींना भाजपशी लग्नाची संधी असूनही पक्षांतर्गत विरोधामुळे प्रवेशालाच सासुरवास भोगावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक मोठा गट सध्या महायुतीच्या प्रेमात पडला आहे. त्यांना पक्षप्रवेशाचे वेध लागले आहेत. एकूण आठ विधानसभा मतदार संघापैकी शिराळा, सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, जत, पलूस-कडेगाव या ठिकाणचे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेते महायुतीत येण्यास इच्छुक आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ, जत आणि पलूस-कडेगाव या तीन मतदारसंघात सध्या दुष्काळी फोरमचे नेते प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू आहे. अजितराव घोरपडे, विलासराव जगताप आणि पृथ्वीराज देशमुख यांची पहिली पसंती भाजपला होती. तरीही शिवसेनेने पाच जागांवर दावा केल्यामुळे पक्षप्रवेश करू इच्छिणाऱ्या या नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. मोठ्या नेत्यांना विधानसभा लढवायची असेल तर त्यांनी शिवसेनेतर्फे लढावे, असे आवाहनही आता शिवसेनेचे नेते करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेल्या या नेत्यांपैकी काहींनी प्रसंगी शिवसेनेतून लढण्याची मानसिकता तयार केली आहे. तरीही ज्या पक्षात ते जाऊ पहात आहेत, त्या पक्षातील निष्ठावंत गटाचा त्यांना विरोध होत आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही हाच अनुभव संजय पाटील यांना आला. त्यातच कुंपणावरील या नेत्यांची पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे, कुठे जायचे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्या तरी, महायुती व आघाडीचे जागावाटप झालेले नाही. त्यामुळे नेमकी राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने करायची, याचा निर्णय घेताना नेत्यांची संभ्रमावस्था वाढली आहे. शिराळ्यात शिवाजीराव नाईकांना स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवारी देण्यास उत्सुक आहे, तर नाईकांनी महायुतीत कोणत्याही पक्षाला ही जागा गेली, तर त्या पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. महायुतीचे जागावाटप होताना सांगली जिल्ह्यात त्यांच्या अन्य घटकपक्षांनाही जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे नेमक्या कोणाच्या जागा कमी होणार, याचेही कोडे सुटलेले नाही. भाजपला हक्काच्या तीन मतदार संघांसह आणखी दोन हवे आहेत. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विट्याचे माजी आमदार अनिल बाबर सध्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या सर्व नेत्यांचे लक्ष आता जागावाटपाकडे लागले आहे.