शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

दांडीबहाद्दर नऊ अधिकाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: January 2, 2015 00:08 IST

लोकशाही दिनास अनुपस्थिती : खुलासा द्यावा लागणार; अधिकाऱ्यांत खळबळ

दिलीप मोहिते -विटा -तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाला विविध शासकीय व निमशासकीय विभागाचे अधिकारी व कार्यालय प्रमुखांना स्वत: हजर राहण्याचे आदेश दिले असतानाही, विटा येथे दि. १५ डिसेंबरला झालेल्या लोकशाही दिनाला तालुक्यातील ९ अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने या अधिकाऱ्यांना तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबतच्या कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना याबाबतचा खुलासा सादर करावा लागणार असून, खुलासा सादर न झाल्यास अथवा तो खुलासा संयुक्तिक न वाटल्यास शिस्तभंगाच्या कारवाईसह खातेनिहाय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या नऊ अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.खानापूर तालुका महसूल विभागाच्यावतीने विटा येथे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. दि. १५ डिसेंबरला तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी सर्व शासकीय व निमशासकीय विभागातील अधिकारी किंवा कार्यालय प्रमुखांना तहसीलदार सौ. मरोड यांनी उपस्थित राहण्याचे लेखी आदेश दिले होते. परंतु, या लोकशाही दिनाकडे खानापूर तालुक्यातील नऊ अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे तहसीलदार मरोड यांनी लोकशाही दिनाला गैरहजर असलेले राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, उपकोषागार कार्यालय, सहकारी संस्थांचे सहायक निबंधक, सुळेवाडी येथील पाटबंधारे मुख्यालयातील शाखाधिकारी, लघुपाटबंधारे विभागातील स्थानिक स्तरचे अधिकारी, दुकाने निरीक्षक, लघुपाटबंधारे उपविभाग क्र. १ चे उपअभियंता व विटा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अशा नऊ अधिकाऱ्यांना तहसीलदार सौ. मरोड यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान, विटा येथील लोकशाही दिनाला दांडी मारणाऱ्या या नऊ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला असून, हा खुलासा आठ दिवसात न दिल्यास किंवा दिलेला खुलासा संयुक्तिक न वाटल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई अथवा त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार असल्याने, लोकशाही दिनाकडे पाठ फिरविणाऱ्या अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.कारवाई होणार का?लोकशाही दिनाबाबत अधिकाऱ्यांमध्ये फारसे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी सांगलीत झालेल्या लोकशाही दिनासही वरिष्ठ अधिकारी गैरहजर होते. विटा येथील लोकशाही दिनाला दांडी मारणाऱ्या नऊ अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. मात्र आजवरचा अनुभव पाहता, या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.